प्रेमाने दीर्घकाळ टिकणारे सुख मिळते, तर शारीरिक संबंधांमुळे तात्कालिक सुख मिळते !

‘पूर्वी मानसिक स्तरावरील प्रेम आधी असे आणि मग शारीरिक संबंध होत असत; परंतु आता अनेक पाश्‍चात्त्य देशांमध्ये शारीरिक संबंध आधी होऊन पुढे जमले, तर दोघांमध्ये मानसिक प्रेम निर्माण होते. यामुळे आताच्या पिढ्यांना तात्कालिक सुख आणि दीर्घकाळ दुःख भोगावे लागत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पाश्चात्त्य संस्कृती स्वीकारून विनाशाच्या खाईत चाललेला समाज !

. . . हिंदूंनी पाश्चात्त्य संस्कृतीचा अंगीकार केल्यामुळे २ पिढ्यांतील, म्हणजेच आई-वडील अन् मुलगा-सूनही एकमेकांशी समरस होऊ शकत नाहीत. आता नवरा-बायकोचेही एकमेकांशी पटत नाही. लग्नानंतर अल्प कालावधीतच त्यांचा घटस्फोट होतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

इंग्रजी भाषेची मर्यादा जाणा !

‘संपूर्ण जगात आज कुठेही गेलो, तर या भूतलावरील विविध विषय इंग्रजी भाषेतून शिकता येतात. त्यामुळे सर्वत्र इंग्रजी भाषेला महत्त्व आले आहे. सर्व जण ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात. असे असले, तरी मनुष्यजन्माचे मूळ ध्येय, म्हणजे ‘ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’, हे इंग्रजी भाषेतून शिकता येत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, आतातरी जागे व्हा आणि इतिहासातून धडा घ्या !

‘काही वाईट घडले की, हिंदू प्रत्येक वेळी ‘आपण कुठे न्यून पडलो ?’, याचा विचार न करता इंग्रजांची शिक्षणपद्धत इत्यादींना दोष देतात ! इंग्रज येण्यापूर्वी मुसलमानांनीही भारतावर राज्य केले. ‘यांना इंग्रज नाहीत, तर हिंदूंची चुकीची विचारसरणी कारणीभूत आहे !’, हे ते लक्षात घेत नाहीत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ऋषी-मुनींवरील ‘कृपा’ !

‘वेद-उपनिषदे लिहिणारे ऋषी-मुनी पूर्वीच्या सात्त्विक काळात होऊन गेले, ते बरे झाले; कारण सध्याच्या तामसिक काळात (कलियुगात) त्यांना कुणीच किंमत दिली नसती.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राजकारणी आणि संत यांच्या कार्यातील भेद !

‘राजकारण्यांकडून स्थुलातून अनुभव येतात, उदा. पूरग्रस्तांना साहाय्य करणे, साधनसुविधा उपलब्ध करून देणे, तर संतांकडून सूक्ष्म स्तरावरील उपायांमुळे अनुभव येतात, उदा. अनेकांच्या कौटुंबिक अडचणींसह शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि आध्यात्मिक अडचणी दूर होतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनी पाश्‍चात्त्य जीवनशैलीचे अंधानुकरण केल्याचा परिणाम !

‘सध्याच्या काळात प्रत्येक भारतियाला महागाई, भ्रष्टाचार, आतंकवाद, असुरक्षितता यांसारख्या अनेक समस्या सातत्याने भेडसावत आहेत आणि दिवसेंदिवस त्यांमध्ये वाढ होत आहे. पूर्वी युगानुयुगे भारताची अशी स्थिती नव्हती. गेल्या शतकांपासून हिंदूंनी पाश्‍चात्त्य जीवनशैलीचे अंधानुकरण केल्यामुळे या समस्या निर्माण झाल्या आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनी साधना करणे अपरिहार्य !

‘सध्याच्या काळात हिंदूंची झालेली दयनीय स्थिती, हे त्यांचे समष्टी प्रारब्ध आहे ! या प्रारब्धावर मात करण्यासाठी सर्व हिंदूंनी साधना करणे, हाच एकमेव उपाय आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

काळाच्या प्रवाहात लय पावणारे विज्ञान, तर काळाची मर्यादा नसणारे अध्यात्म !

‘संशोधकांचे कार्य हे मन आणि बुद्धी यांच्या स्तरांवरील असल्यामुळे त्याला काळाची मर्यादा असते. काही काळानंतर त्यांच्या संशोधनामध्ये पालट होतो किंवा ते लयास जाते. याउलट अध्यात्मातील पंचमहाभूते, पंचतत्त्वे, त्रिगुण यांसारखी तत्त्वे युगानुयुगे तीच आहेत. त्यामध्ये काही पालट होत नाही. त्यांना काळाची मर्यादा नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वृद्धाश्रमात आई-वडिलांना ठेवणे अत्यंत लज्जास्पद !

‘भारतीय संस्कृतीत कधीही वृद्धाश्रम नव्हते. ते पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण आहे. ते आई-वडिलांबद्दल कृतज्ञतेऐवजी द्वेष दर्शवते. पुढे काही मृत आई-वडिलांनी पूर्वज होऊन कुटुंबियांना त्रास दिल्यास त्यात आश्‍चर्य ते काय ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले