चीनपासून सा‍वध राहिल्यासच भारताचे महासत्ता बनणे शक्य !

‘‍वर्ष १९७१ च्या भारत-पाक युद्धात पाकिस्तानच्या साहाय्यासाठी नौसेना पाठवू इच्छिणार्‍या चीनचा कपटी कावा लक्षात ठेवून अर्थकारणाची पावले उचलल्यासच भारत महासत्ता बनू शकेल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारतीय हिंदूंनी हे कदापि विसरू नये !

‘जगातील एकमेव हिंदु राष्ट्र असणार्‍या नेपाळला चीनमुळे साम्यवादी बनवण्यात आले. हे देशातील हिंदूंनी कदापी विसरू नये.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

चीनधार्जिण्यांना भारतात रहाण्याचा अधिकार नाही !

‘१९६२ च्या युद्धात भारताची भूमी चीनने बळकावली, हा राष्ट्रीय अपमान आहे. हे विसरणार्‍यांना देशात रहाण्याचा अधिकार आहे काय ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

चीनचा कळवळा असणाऱ्यांनो, हे लक्षात घ्या !

‘हिंदू-चिनी भाई-भाई’, असे म्हणणारे चीनच्या आक्रमणात मृत्यू पावले, तर कोणास दु:ख का वाटावे ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्रात भारतीय भाषांनाच प्राधान्य असेल !

‘हिंदूंनो, मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांत घालू नका; कारण हिंदु राष्ट्रात भारतीय भाषा या शाळेतील आणि सरकारी कारभाराचे माध्यम असतील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

देवाचे वैशिष्ट्य आणि मनुष्याची मर्यादा !

‘देवाने मनुष्याला बनवले, जो त्याच्याशी परत एकरूप होऊ शकतो. मनुष्याने अनेक गोष्टी निर्माण केल्या; पण त्यातील एकही परत मनुष्याशी एकरूप होऊ शकत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ईश्‍वरप्राप्तीसाठी अनावश्यक ठरणारी हल्लीची शिक्षणपद्धती !

हल्लीच्या शिक्षणामध्ये ‘नामजप, सत्सेवा यांसारख्या आध्यात्मिक कृती शिकवल्या जात नाहीत. जे काही शिक्षण दिले जाते, त्याने आध्यात्मिक उन्नती होऊच शकत नाही. थोडक्यात शालेय शिक्षणात ईश्‍वरप्राप्तीच्या दृष्टीने अनावश्यक कृती शिकवल्या जातात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानाची मर्यादा आणि अध्यात्माचे अलौकिकत्व !

‘विज्ञान मानवी जीवन सुखी करण्यासाठी आहे, तर अध्यात्म मानवी जीवन आनंदी करण्यासाठी आणि ईश्वरप्राप्ती करून देणारे आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गांधीवाद्यांची आत्मघातकी अहिंसा !

‘राम आणि कृष्ण यांच्या युगांत गांधीवादी असते, तर त्यांनी राम-कृष्ण यांनाही अहिंसावाद शिकवण्याचा प्रयत्न केला असता आणि रावण अन् कंस यांना जिवंत ठेवले असते. त्यामुळे हिंदू नष्टच झाले असते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्मकार्य करण्याचे अलौकिक महत्त्व !

‘एखाद्या जातीचे किंवा पंथाचे कार्य करणार्‍यांचे, म्हणजे जात्यंधांचे, पंथांधांचे कार्य तात्कालिक असते. धर्माचे मानवजातीसाठीचे कार्य स्थळ आणि काळ यांची मर्यादा ओलांडून पुढे जाते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले