साधनेचे महत्त्व !

‘पूर्वीच्या काळात सर्व साधना करणारे असल्यामुळे त्यांना ‘इतरांशी कसे बोलावे ? इतरांसमवेत कसे वागावे ?’, हे शिकवावे लागत नसे. ते लहानपणापासूनच अंगी मुरलेले असे. आता मात्र ते प्रत्येकाला शिकवावे लागते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘हिंदु राष्ट्रा’तील शिक्षणपद्धत अशी असेल !

‘हिंदु (ईश्‍वरी) राष्ट्रातील शिक्षणपद्धत कशी असेल ?’, असा प्रश्‍न काही जण विचारतात. त्याचे उत्तर आहे, ‘नालंदा आणि तक्षशिला विश्‍वविद्यालयांत ज्याप्रमाणे १४ विद्या आणि ६४ कला शिकवायचे, त्याप्रमाणे शिक्षण दिले जाईल; मात्र त्यांत या माध्यमांतून ‘ईश्‍वरप्राप्ती कशी करायची ?’, हेही शिकवले जाईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सनातन प्रभात’चे वेगळेपण !

‘बहुतेक वर्तमानपत्रे केवळ बातम्या देण्यापेक्षा अधिक काय करतात ? याउलट ‘सनातन प्रभात’ राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील कृतींसाठी प्रोत्साहन देते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, निराश होऊ नका !

‘हिंदूंनो, जगभरातीलच नाही, तर बहुसंख्य हिंदू असलेल्या भारतातीलही हिंदूंसाठी दुःखकारक असलेल्या बातम्या मृतवत् हिंदूंमुळे वाढत आहेत. त्यामुळे निराश होऊ नका, तर साधना करत रहा. ‘वर्ष २०२३ पासून हिंदूंसाठी काळ पूरक होईल आणि तो १००० वर्षे पूरक असेल’, असे अनेक संतांनी अन् नाडीभविष्यांत सांगितले आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

स्वराज्य हे सुराज्य नसते !

‘स्वराज्य हे सुराज्य नसते. याचे कारण हे की, रज-तमप्रधान लोकांचे स्वराज्य कधी सुराज्य नसते. भारताने हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची ७५ वर्षे अनुभवले आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राजकारणी आणि खरे संत यांच्याकडे पहाण्याचा जनतेचा दृष्टीकोन !

‘राजकारण्यांना त्यांचे पद गेल्यावर कुणाला त्यांचे नावही आठवत नाही. याउलट खर्‍या संतांकडून जनतेला काहीही नको असते. उलट लोक खर्‍या संतांना काहीतरी अर्पण करतात, संतांनी सांगितलेली साधना करतात आणि साधनेत पुढे जातात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

परिपूर्ण आणि एकमेवाद्वितीय हिंदु धर्म !

‘केवळ हिंदु धर्माच्या ग्रंथांत विश्वाची रचना, अणू-परमाणू, अदृश्य सृष्टी, पाप-पुण्य, वाईट शक्तींचा त्रास कसा दूर करायचा, ईश्वरप्राप्ती कशी करायची इत्यादींची संपूर्ण माहिती दिली आहे. इतर काही धर्मांत त्यांचा उल्लेख असल्यास केवळ तो शब्दापुरता केला आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्माचे सर्वश्रेष्ठत्व !

‘हिंदु धर्म ‘ईश्‍वरप्राप्ती कशी करायची’, हे शिकवतो, तर इतर धर्म दुसर्‍यांवर आक्रमण करून त्यांना त्यांचा धर्म स्वीकारण्यास भाग पाडतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अशांना सीमेवर लढण्यास पाठवले पाहिजे !

‘हिंदू-मुस्लिम भाई-भाई’ किंवा ‘हिंदू-चिनी भाई-भाई’, असे म्हणणार्‍यांना भारत-पाक किंवा भारत-चीन सीमारेषांवर लढण्यास पाठवले पाहिजे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

देवतांच्या संदर्भातील कथा त्यातून शिकण्यासाठी वाचा !

‘देवतांच्या संदर्भातील कथांमधून शौर्य, पराक्रम, ज्ञान, भक्ती, नीती यांसारखे अनेक पैलू शिकायला मिळतात. हे सर्व शिकण्याच्या उद्देशाने देवतांच्या कथा वाचल्या, तर आपल्यात त्या देवतेबद्दल भाव जागृत होण्यास साहाय्य होऊ शकते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले