सर्वधर्मसमभाव म्हणणे ही अज्ञानाची परिसीमा !

‘जगात केवळ सर्व धर्मांचा अभ्यास न केलेले हिंदू ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणतात. बाकी एकाही धर्मातील एकही जण तसे म्हणत नाही. हिंदूंच्या हे लक्षात येत नाही की, ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणे ही अज्ञानाची परिसीमा आहे, ‘प्रकाश आणि अंधार समान आहेत’, असे म्हणणे आहे !’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकीय क्षेत्रातील सर्वच कार्यकर्त्यांचे विषय मायेतील असल्यामुळे त्यांचे लिखाण अधिक काळ टिकत नाही. याउलट आध्यात्मिक क्षेत्रातील लिखाण बराच काळ किंवा युगानुयुगेही टिकते, उदा. वेद, उपनिषदे, पुराणे इत्यादी.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हुशार कोण ?

‘पैसे मिळवण्यासाठी भारतीय अमेरिकेत जातात, तर ईश्‍वरप्राप्तीसाठी जगभराचे भारतात येतात ! यांतून हुशार कोण, हे तुम्हीच ठरवा !’

बादशाहांचा क्रूर इतिहास शिकवा !

पाठ्यपुस्तकातून बाबर, अकबर, औरंगजेब आदी धर्मांध बादशाहांची क्रूर अत्याचारांची माहितीही इतिहासातून शिकवा, म्हणजे पुढच्या पिढ्या सावध रहातील ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

‘आंधळे’ बुद्धीप्रामाण्यवादी !

‘एखाद्या आंधळ्याने दृश्याचे वर्णन करावे, याप्रमाणे धर्माचे शून्य  ज्ञान असलेल्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे धर्माच्या संदर्भातील बोलणे असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

परात्पर गुरु डॉक्टरांचे अध्यात्मविषयक मार्गदर्शन

‘शारीरिकदृष्ट्या विचार केला, तर वयोमानानुसार माझे विस्मृतीचे प्रमाण वाढत आहे; पण आध्यात्मिकदृष्ट्या मी नेहमी वर्तमानकाळात रहात असल्यामुळे मला भूतकाळातील काही आठवत नाही आणि भविष्यात स्थापन होणार्‍या हिंदु राष्ट्राचा विचारही माझ्या मनात येत नाही.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘एखाद्या व्यक्तीच्या जीवनात असे का घडते ?, तसेच प्रारब्ध, वाईट शक्ती, सात्त्विकता इत्यादी शब्दही ज्ञात नसलेले पाश्चात्त्य संशोधन वरवरचे आहे, म्हणजे पोरखेळ आहे ! अशा पाश्चात्त्यांचे हिंदू अनुकरण करतात, हे हास्यास्पद आहे !’ –  (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व !

‘हिंदु धर्मात सांगितले आहे तितके सखोल ज्ञान इतर एकातरी पंथात आहे का ? विज्ञानाला तरी ज्ञात आहे का ?’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सच्चिदानंद ईश्वराची प्राप्ती कशी करायची, हे अध्यात्मशास्त्र सांगते, तर ‘ईश्वर नाहीच’, असे काही  विज्ञानवादी, म्हणजे बुद्धीप्रामाण्यवादी ओरडून सांगतात !’ –  (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘विज्ञानाने विविध यंत्रे शोधून मानवाचा वेळ वाचेल असे केले; पण ‘त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा’, हे न शिकवल्याने मानव पराकोटीच्या अधोगतीला गेला आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले