परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अध्यात्माविषयी मार्गदर्शन

‘अध्यात्म हे अनंताचे शास्त्र असल्यामुळे ते इतरांना शिकवण्यात वेळ घालवण्यापेक्षा ते शिकण्यासाठी वेळ द्यावा. मी आयुष्यभर केवळ शिकण्यालाच महत्त्व दिले आहे.’

बुद्धीप्रामाण्यवाद्यांसंदर्भातील शोकांतिका !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना जिज्ञासा नसल्याने ते स्वतःला आहे तेवढ्या छोट्याशा ज्ञानात (अज्ञानात) रहातात. त्यांना पुढचे पुढचे काहीच कळत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

राजकारणी आणि सांप्रदायिक यांच्यातील भेद !

‘स्वार्थासाठी राजकीय पक्ष पालटणारे सहस्रो असतात; पण स्वार्थत्यागी सांप्रदायिकांच्या मनाला संप्रदाय पालटण्याचा विचार एकदाही शिवत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

देव आणि मानव यांच्यातील भेद !

‘देव जमीन, पाणी, हवा इत्यादी सर्व फुकट देतो. मानव मात्र प्रत्येक गोष्ट विकत देतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

स्वराज्य हे सुराज्य नसते !

‘स्वराज्य हे सुराज्य नसते. याचे कारण हे की, रज-तमप्रधान लोकांचे स्वराज्य कधी सुराज्य नसते. भारताने हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची ७४ वर्षे अनुभवले आहे.’

हिंदूंनो, स्वरक्षणासाठी साधना करा !

‘शारीरिक आणि मानसिक बळांपेक्षा आध्यात्मिक बळ श्रेष्ठ असूनही हिंदू साधना विसरल्यामुळे चिमूटभर धर्मांध आणि इंग्रज यांनी काही वर्षांतच संपूर्ण भारतावर राज्य केले ! आता तसे पुन्हा होऊ नये; म्हणून हिंदूंनी साधना करणे अतिशय आवश्यक आहे.’

महायुद्धापासून रक्षण होण्यासाठी साधना आवश्यक !

‘एखादा रोग होऊ नये; म्हणून लसीकरण म्हणजेच ‘व्हॅक्सिनेशन’ करतो, तसेच तिसऱ्या महायुद्धाच्या काळात वाचण्यासाठी साधना हीच लस आहे.’

प्रत्येक पिढीचे कर्तव्य !

‘प्रत्येक पिढी पुढील पिढीकडे समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात अपेक्षेने पहाते. याऐवजी प्रत्येक पिढीने ‘आम्हाला काय करता येईल ?’, असा विचार करून असे कार्य केले पाहिजे की, पुढच्या पिढीला त्यांसंदर्भात काही करण्याची आवश्यकता न उरल्याने ती सर्व वेळ साधनेला देऊ शकेल !’

परात्पर गुरु डॉक्टरांचे अध्यात्मविषयक मार्गदर्शन

‘एखाद्याने एखादी वस्तू दिली, तर घेणाऱ्याला आनंद होतो. यापुढे गेल्यावर वस्तू देणाराच मिळाला, तर त्याला किती आनंद होईल ! ईश्वरच सर्व गोष्टी देणारा असल्याने त्याच्या प्राप्तीने सर्वाेच्च आनंद होतो !’

जगात एकमेव धर्म आहे हिंदु धर्म !

सनातन हिंदु धर्माला उत्पत्ती नसल्यामुळे, म्हणजे तो अनादि असल्यामुळे तो अनंत काळपर्यंत रहाणार आहे. हे हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आहे. जगात दुसरा धर्मच नसल्यामुळे ‘सर्वधर्मसमभाव’ हा शब्द किती अयोग्य आहे, हेही यावरून लक्षात येते.’