मुलांना साधना न शिकवल्याचा परिणाम !

‘म्हातारपणी मुले लक्ष देत नाहीत’, असे म्हणणार्‍या वृद्धांनो, तुम्ही मुलांवर साधनेचे संस्कार केले नाहीत, याचे ते फळ आहे. याला मुलांबरोबर तुम्हीही उत्तरदायी आहात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कृतघ्नपणाची परिसीमा !

‘आपण आईचे दूध पितो, त्याप्रमाणे गायीचे दूध पितो; म्हणून गायीला गोमाता म्हणतात. असे असतांना गायीचीच हत्या करणे, हे आईची हत्या करण्यासारखेच झाले. ही कृतघ्नपणाची परिसीमा होय !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रशासन आणि राजकारणी यांना हे लज्जास्पद !

‘चूक झाल्यास सर्वसाधारण व्यक्तीही क्षमा मागते; पण असंख्य चुका करणारे पोलीस, प्रशासनातील व्यक्ती आणि राजकारणी एकदा तरी क्षमा मागतात का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

व्यवहार आणि अध्यात्म यातील भेद !

‘व्यवहारात पैसे मिळाले की, व्यक्ती ते स्वतःकडे ठेवते; मात्र अध्यात्मात ईश्‍वराचे प्रेम मिळाले की, संत ते सर्वांना वाटतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

जनतेने नशेला बळी पडू नये, यासाठीचा मूलगामी उपाय !

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या भक्तीची गोडी निर्माण केली असती, तर कुणी दारू अन्‌ सिगारेट यांच्या नशेला बळी पडला नसता !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कृतघ्न तरुण !

‘ज्या आई-वडिलांनी जन्म दिला आणि लहानाचे मोठे केले, त्यांची काळजी त्यांच्या म्हातारपणात हल्लीचे बरेच कृतघ्न तरुण घेत नाहीत. आई-वडिलांची काळजी न घेणारे देवाचे काही करतील का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

निरर्थक बुद्धीप्रामाण्यावादी !

‘भारतातील हिंदूंनाच नव्हे, तर जगातील मानवजातीला आधार वाटतो हिंदु धर्माचा ! त्यामुळे जगभरचे जिज्ञासू अध्यात्म शिकण्यासाठी भारतात येतात. बुद्धीप्रामाण्यवादी, धर्मविरोधी आणि साम्यवादी यांचे तत्त्वज्ञान शिकण्यासाठी भारतात कुणीही येत नाही; पण हेही त्यांच्या लक्षात येत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांनी हे लक्षात ठेवावे !

‘काम न करणे, भ्रष्टाचार करणे इत्यादींची सवय झालेले बहुतेक पोलीस आणि सरकारी कर्मचारी अन् अधिकारी यांना एकही खासगी आस्थापन एकही दिवस नोकरीत ठेवणार नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आद्य शंकराचार्यांचा काळ आणि आताचा काळ यांतील धर्मविरोधकांमधील भेद !

‘आद्य शंकराचार्यांनी भारतात सर्वत्र फिरून हिंदु धर्माच्या विरोधकांबरोबर वाद-विवादात त्यांना जिंकून हिंदु धर्माची पुनर्स्थापना केली. त्या काळचे विरोधक वाद-विवाद करत. याउलट हल्लीचे धर्मविरोधक वाद-विवाद न करता केवळ शारीरिक आणि बौद्धिक गुंडगिरी करतात.‘ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंमध्ये दुही निर्माण करणारे राष्ट्रविरोधीच !

‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद निर्माण करणार्‍यांनी हिंदूंमध्ये दुही निर्माण केली. त्यामुळे हिंदु आणि भारत यांची स्थिती बिकट झाली आहे; म्हणून दुही करणारे राष्ट्र आणि धर्म विरोधी होत !’