भारतियांनो, साधनेचे महत्त्व लक्षात घ्या !

‘हल्ली पाश्‍चात्त्य देशांत बहुधा भांडायला हक्काचे कुणी असावे; म्हणून लग्न करतात ! पुढे भांडणाचा कंटाळा आला की, घटस्फोट घेतात. नंतर पुन्हा लग्न करतात आणि पुन्हा घटस्फोट घेतात. असे चक्र चालू रहाते ! आपल्याकडे ही स्थिती होऊ नये; म्हणून साधना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारताची स्थिती बिकट होण्यामागील कारण !

‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद निर्माण करणार्‍यांनी हिंदूंमध्ये दुही निर्माण केली. त्यामुळे हिंदू आणि भारत यांची स्थिती बिकट झाली आहे; म्हणून दुही करणारे राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही होत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राची आवश्यकता जाणा !

‘भ्रष्टाचार, बलात्कार, बुद्धीप्रामाण्यवाद, अनैतिकता, गुंडगिरी, देशद्रोह, धर्मद्रोह इत्यादींना आता जे उधाण आले आहे, त्याला कारणीभूत आहेत, स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची ७५ वर्षे जनतेला साधना, नैतिकता इत्यादी न शिकवणारी आतापर्यंतची सरकारे ! यातूनच हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता लक्षात येते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

. . . पण देशात किती कोटी मानव सुखाने राहू शकतील, त्यांना पुरेसे अन्न-पाणी मिळेल, याचा विचार न करणार्‍या आतापर्यंतच्या सरकारांमुळे देशाची लोकसंख्या स्वातंत्र्याच्या वेळी ३५ कोटी होती. ती आता १३५ कोटींहून अधिक झाली आहे. हे सर्व सुधारण्यासाठी आता हिंदु राष्ट्र हाच पर्याय आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पुढील पिढ्यांच्या कल्याणासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक !

‘धर्मद्रोही, पुरोगामी आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांनी उद्या ‘विवाहित स्त्रियांनी मंगळसूत्र घालू नये, कुंकू लावू नये, मंगळागौर आणि वटपौर्णिमा करू नये’ इत्यादी फतवे काढल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! याकरिता पुढील पिढ्यांच्या कल्याणासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पुरोगाम्यांची आदिमानवाकडे वाटचाल !

‘मानव प्रगत होतो, तसे त्याच्यात नम्रता, विचारून सर्व करण्याची वृत्ती इत्यादी गुण निर्माण होतात. पुरोगाम्यांत विचारण्याची आणि शिकण्याची वृत्ती नसते, उलट ‘मला सर्व समजते. मला वाटते तेच योग्य !’, हा अहंकार असल्याने त्यांची वाटचाल आदिमानवाकडे होत आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘मानवाची प्रगती’ कशाला म्हणतात, हेही ज्ञात नसलेले विज्ञान !

‘पाश्‍चात्त्यांचे विज्ञान सांगते, ‘आदिमानवापासून आतापर्यंत मानवाने प्रगती केली आहे.’ प्रत्यक्षात मानवाने प्रगती केलेली नसून तो परमावधीच्या अधोगतीकडे जात आहे . . . कलियुगाच्या उरलेल्या अनुमाने ४ लक्ष २६ सहस्र वर्षांत त्याची किती अधोगती होईल, याची कल्पनाही करता येत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कुठे विविध क्षेत्रांतील तज्ञ, तर कुठे संत !

‘आधुनिक वैद्य (डॉक्टर), अधिवक्ता, लेखापाल इत्यादी सर्वच त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील तज्ञ त्यांच्या क्षेत्रातील प्रश्‍नांची उत्तरे लगेच सांगू शकत नाहीत . . . याउलट संत एका क्षणात कोणत्याही प्रश्‍नाचा कार्यकारणभाव आणि उपाय सांगतात, जे आधुनिक तज्ञ कधीही सांगू शकत नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हास्यास्पद बुद्धीप्रामाण्यवादी !

‘अशिक्षिताने ‘सूक्ष्म जंतू नाहीत’, असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’ असे म्हणणे हास्यास्पद आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गुरुमंत्राचे महत्त्व लक्षात न घेता गुरूंच्या देहाच्या नावात अडकणारे शिष्य !

शिष्याच्या उद्धारासाठी गुरु शिष्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार गुरुमंत्र म्हणून एखाद्या देवतेचा नामजप करण्यास सांगतात. हा नामजप त्या साधकाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी पोषक/पूरक असतो, तसेच त्या जपामागे गुरूंचा संकल्पही कार्यरत असतो.