तांब्याच्या वस्तूंवरील विषाणू काही मिनिटांतच नष्ट होतात ! – संशोधनाचा दावा

तांब्याच्या वस्तूंवर एखादा विषाणू असला, तर तो काही मिनिटांतच नष्ट होतो, असा दावा संशोधनातून करण्यात आला आहे.

(म्हणे) ‘मूर्तीपूजा करणार्‍या देशांना अल्लाने उत्तर दिले !’

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव होत असतांना आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटना इसिसने एक परिपत्रक काढले आहे की, अल्लाने स्वत: निर्माण केलेल्या देशांमध्ये पुष्कळ मोठे संकट आणले आहे. मूर्तीपूजा करणार्‍या देशांना ही कठोर चेतावणी आहे.

सोलापूर येथे जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण समितीची स्थापना 

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात जिल्ह्यात अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू यांचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हास्तरीय अन्नधान्य वितरण नियंत्रण समिती स्थापन केली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आज ‘जी-२०’ राष्ट्रांची आपत्कालीन परिषद, पंतप्रधान नरेंद्र मोदीही होणार सहभागी

कोरोनाच्या जागतिक महामहारीमुळे जगभरातील सर्वच देशांना त्याचा फटका बसला असून या संकटातून तोडगा काढण्यासाठी आज ‘जी-२०’ राष्ट्रांची आपत्कालीन परिषद आयोजित करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांकडून तक्रार निवारण केंद्र कार्यरत

जमावबंदीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुणे पोलिसांकडून तक्रार निवारण केंद्र कार्यरत करण्यात आले आहे. दिवसा ५, तर रात्री २ कर्मचारी आणि पोलीस उपायुक्त दर्जाचा अधिकारी यांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

अनावश्यक फिरणार्‍यांच्या ५० हून अधिक दुचाकी पोलिसांकडून कह्यात

शहरातून विनाकारण कुणीही दुचाकीवरून फिरतांना आढळल्यास संबंधितांची दुचाकी शासनाधीन करण्यात येणार आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली आहे.

किराणा दुकानदारांची सूची प्रशासनाकडून सिद्ध ! – माधवी कदम, नगराध्यक्षा, सातारा नगरपरिषद

भाजीपाला घरपोच देण्याविषयीही विचार चालू

कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत २२ सहस्र ६५ जणांचा मृत्यू

कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत २१ सहस्र २९७ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ घंट्यांमध्ये अनुमाने २ सहस्र ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४ लाख ७२ सहस्र २९ झाली असून उपचार करून बरे झालेल्यांची संख्या १ लाख १४ सहस्र ७१३ इतकी आहे.

सोलापूर येथे उत्पादकाचे नाव आणि परवाना क्रमांक नसलेल्या ‘सॅनिटायझर’च्या १०० बाटल्या जप्त

येथील अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यालयाने उत्पादकाचे नाव अन् परवाना क्रमांक नमूद नसलेल्या ‘सॅनिटायझर’च्या १०० बाटल्या जप्त केल्या आहेत.

उत्तरप्रदेशातील बुलंदशहरामध्ये दळणवळण बंदी असतांना मशिदीमध्ये नमाजपठण

डीबाई पोलीस ठाण्याच्या परिसरातील अमर हमजा मशीद आणि सराय मशीद या दोन्ही ठिकाणी मुसलमान गुप्तपणे नमाजपठण करण्यास जात होते.