प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एस्.टी. आगाराचे संपर्क क्रमांक तात्काळ चालू करा ! – सुराज्य अभियानाचे निवेदन

आगार व्यवस्थापक नामदेव पतंगे यांच्याशी चर्चा करतांना श्री. भगवंतराव जांभळे (डावीकडे) आणि श्री. संजय घाटगे (उजवीकडे)

कुरुंदवाड (जिल्हा कोल्हापूर), २२ डिसेंबर (वार्ता.) – प्रवाशांच्या सुविधेसाठी गाड्यांची माहिती देण्यासाठी प्रत्येक आगारात अधिकृत संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिलेला असतो. असे असतांना आपल्या अंतर्गत असलेल्या एस्.टी. आगारातील अधिकृत संपर्क क्रमांक अकार्यक्षम रहातात. तरी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हे क्रमांक तात्काळ चालू करण्यात यावेत, या मागणीचे निवेदन ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने कुरुंदवाड आगार व्यवस्थापक नामदेव पतंगे यांना देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यावर ‘या संदर्भात योग्य ती कार्यवाही करू, तसेच असा क्रमांक बंद आढळल्यास प्रसंगी दंडात्मक कारवाई करू’, असे आश्वासन आगार व्यवस्थापकांनी दिले. या प्रसंगी ‘सुराज्य अभियाना’चे श्री. संजय घाटगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. भगवंतराव जांभळे, सामाजिक कार्यकर्ते श्री. विनय चव्हाण, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. किशोर बुरुड यांसह अन्य उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात का येत नाही ?