
मुंबई – केंद्रीय मिठागार मंत्रालयाने स्वत:ची भूमी महाराष्ट्र शासनाला हस्तांतरित केली आहे. त्यामुळे दहिसर ते भाईंदर या महामार्गाच्या निर्माणातील मोठा अडथळा दूर झाला आहे. येत्या ३ वर्षांत हा मार्ग सिद्ध झाल्यानंतर नरिमन पॉईंट ते मीरा-भाईंदर हे अंतर सागरी किनारा मार्गाद्वारे अर्धा घंट्यात पूर्ण करता येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
ते म्हणाले, मागील ४-५ वर्षे सातत्याने केंद्रीय मिठागार मंत्रालय आणि राज्यशासन यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे दहिसर-भाईंदर ६० मीटर रस्त्यामधील ५३.१७ एकर जागा केंद्रीय मीठागार मंत्रालयाने राज्यशासनाच्या माध्यमातून मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची मान्यता दिली आहे. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सागरी किनारा मार्ग उत्तनपर्यंत येणार आहे. तेथून दहिसर-भाईंदर हा ६० मीटर रुंदीचा रस्ता मीरारोड येथील सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत येऊन तेथून वसई आणि विरार या शहराला जोडला जाणार आहे.
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !