‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या कालावधीत अहिल्यानगर येथील धर्मप्रेमी आणि हितचिंतक यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती 

‘१७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचा प्य महोत्सव’ या निमित्ताने ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित केला होता. त्या निमित्त अहिल्यानगर येथील धर्मप्रेमी आणि हितचिंतक यांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. श्री. अजिंक्य गायकवाड     

अ. ‘सनातन संस्थेचा व्याप एवढा मोठा आहे, हे मी प्रथमच अनुभवले.

आ. विदेशातील साधकांबद्दल सांगितलेली माहिती मनापासून ऐकली. मला साधना करण्यासाठी ऊर्जा मिळाली.’

२. श्री. अजिंक्य कुलकर्णी   

अ. ‘मला गुरुदेवांचे दर्शन झाल्यावर माझ्या डोळ्यांतून भावाश्रू आले. ‘गुरुदेवांनी साधक कसे घडवले असतील ?’, त्याबद्दल मला कृतज्ञता वाटली.

आ. मला वेळोवेळी साधकांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे वाहनाशी संबंधित सेवा करता आली.’

३. श्री. उत्कर्ष गिते 

३ अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली ८३ व्या वर्षीसुद्धा साधकांचे संघटन करू शकतात, ते पाहून मला आश्चर्य वाटले.’

४. श्री. विजय गाडेकर 

अ. ‘माझ्या आयुष्यातील हा प्रवास आणि ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ कायमचाच माझ्या लक्षात राहील.

आ. इथून पुढे मी अधिकाधिक सेवा आणि साधना करण्यासाठी वेळ देईन.’

५. श्री. ज्ञानेश्वर कुलथे

५ अ. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त सहभागी झाल्यावर हिंदु राष्ट्र किती दैवी असेल !’, हे अनुभवायला मिळणे : मी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त सहभागी झालो होतो. त्या वेळी ‘हिंदु राष्ट्र निश्चितच चैतन्यपूर्ण आणि देवनिर्मित असेल’, असे अनुभवायला मिळाले. ‘आध्यात्मिक साधना, शास्त्र आणि क्षात्रतेज, गुरुजनांचे आशीर्वाद’ यातून हे हिंदु राष्ट्र निर्मित होऊन निश्चितच पुढे अनादी अन् सनातन काळ आहे. ‘सनातनच्या अनेक साधकांचा सहवास मला लाभला’, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १९.५.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक