गेल्या २ वर्षांत एकूण ७ चित्ते मृत्यूमुखी !
नवी देहली – वर्ष २०२२ मध्ये झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या वाढदिनी नामिबियावरून काही चित्ते भारतात आणण्यात आले होते. यांपैकी ‘पवन’ या चित्त्याचा २७ ऑगस्टला मध्यप्रदेशाच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात मृत्यू झाला. पाण्यात बुडाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्रारंमिक अंदाज आहे. पवनच्या मृत्यूनंतर आता कुनो राष्ट्रीय उद्यानात २४ चित्ते उरले आहेत. त्यांपैकी १२ मोठे आणि तेवढीच नवजात पिले आहेत.
सिंह प्रकल्पाचे संचालक उत्तम शर्मा यांनी याविषयी सांगितले की, कुनोमधील एका नाल्यात पवनचा मृतदेह आढळला. त्याच्या शरिरावर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत. पवनला १७ सप्टेंबर २०२२ या दिवशी नामिबियावरून भारतात आणले होते. गेल्या २ वर्षांत एकूण ७ चित्ते मृत्यूमुखी पडले आहेत.