बरेली (उत्तरप्रदेश) – बरेली जिल्ह्यातील इज्जतनगर येथील गोपेश्वर नाथ मंदिरात देवतांच्या मूर्ती फोडल्याच्या प्रकरणी पोलिसांनी शाहरुख, अर्शद आणि अक्रम या तिघांना अटक केली आहे. २१ जुलैच्या रात्री या तिघांनी मंदिरात घुसून ही तोडफोड केली होती. या वेळी ते पळून जात असतांना जमावाने अक्रम याला पकडले, तर शाहरुख आणि अर्शद पळून गेले. अक्रम याला जमावाने चोप देऊन पोलिसांच्या कह्यात दिले. यानंतर पोलिसांनी अन्य दोघांनाही अटक केली. जमावाने केलेल्या मारहाणीमुळे घायाळ झालेल्या अक्रम याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
गेल्या काही मासांत देशात मंदिरांवर झालेली काही आक्रमणे !
१. पंजाबमधील लुधियाना येथील शिवमंदिरावर धारदार शस्त्रांद्वारे आक्रमण करून १४ मूर्तींची मोडतोड करण्यात आली होती. तसेच येथील शिवलिंगही काढून फेकले होते.
२. मध्यप्रदेशातील गुना जिल्ह्यात असलेल्या पीपलेश्वर महादेव मंदिरातही तोडफोड करण्यात आली होती. या घटनेत अज्ञातांनी मंदिराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून शिवलिंग काढून रस्त्यावर फेकले होते.
३. उत्तरप्रदेशातील वाराणसीच्या दुबकिया गावात असलेल्या श्री हनुमान मंदिरातील मूर्तींची तोडफोड करण्यात आली होती.
संपादकीय भूमिका
|