स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदु राष्‍ट्र दर्शन आणि दूरदर्शीपणा !

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘हिंदुत्‍व’ हे पुस्‍तक लिहिले, त्‍याला वर्ष २०२३ मध्‍ये १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्‍यांच्‍या मनात हिंदु राष्‍ट्राच्‍या संकल्‍पनेविषयी विचार प्रक्रिया पूर्वीपासूनच आरंभ झाली होती. ते रत्नागिरी येथे कारावासात असतांना त्‍यांनी हे पुस्‍तक पूर्ण केले. वीर सावरकर इतिहासाचे चांगले अभ्‍यासक होते. त्‍यांनी १०० वर्षांपूर्वी जे विचार दिले होते, ते आपण कार्यवाहीत आणले नाहीत. त्‍यामुळे वर्ष १९४७ मध्‍ये देशाची फाळणी झाली. वर्ष १९४७ नंतरही ते कार्यवाहीत आणले गेले नाहीत. त्‍यामुळे आज पुन्‍हा तशीच परिस्‍थिती निर्माण झाली आहे. पुढील वर्ष २०४७ मध्‍ये ती परिस्‍थिती परत निर्माण होऊ शकते, हे फार मोठे संकट या देशावर येऊ घातले आहे. आपल्‍याला हिंदु राष्‍ट्राविषयी काही बोलायचे असेल, तर प्रथम हिंदु राष्‍ट्राची संकल्‍पना समजून घेतली पाहिजे. त्‍यात वीर सावरकर यांची हिंदुत्‍वाची संकल्‍पना पूर्णतः समजून घ्‍यावी लागेल आणि ती कार्यवाहीत आणावी लागेल. जे आपण गेल्‍या १०० वर्षांमध्‍ये केले नाही, ते आज आपल्‍याला करावेच लागेल. पुढील २०-२५ वर्षांमध्‍ये आपण आपल्‍या देशासाठी काही करू शकलो, तरच आपण वाचणार आहोत.

श्री. रणजित सावरकर यांचा परिचय

श्री. रणजित सावरकर

श्री. रणजित सावरकर हे वीर सावरकर यांचे नातू आहेत. ‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारका’चे ते कार्याध्‍यक्ष आहेत. त्‍यांचे वडील दिवंगत विक्रम सावरकर यांनी स्‍थापन केलेल्‍या ‘महाराष्‍ट्र मिलिटरी स्‍कूल’चे ते संचालक आहेत. ते ‘हिंदुस्‍थान पोस्‍ट मीडिया हाऊस’चे मुख्‍य संपादक, तसेच ‘महाराष्‍ट्र बॉक्‍सिंग असोसिएशन’चे अध्‍यक्षही आहेत. ते विविध माध्‍यमातून स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार युवा पिढीपर्यंत पोचवण्‍याचे कार्य करतात.

१. बौद्धांच्‍या सहकार्याने महंमद कासिमकडून राजा दाहिरचा पराभव 

भारतात ८० टक्‍के हिंदु आहेत. कोण्‍या एकेकाळी आपण १०० टक्‍के हिंदु होतो. वर्ष १७९० मध्‍ये महंमद कासिम ५ सहस्र घोडेस्‍वारांसह सिंधच्‍या राजा दाहिरवर आक्रमण करण्‍यासाठी अरबस्‍तानातून आला होता. त्‍यासाठी त्‍याला ३ सहस्र किलोमीटरचे अंतर पार करावे लागले होते. केवळ ५ सहस्र घोडेस्‍वारांनी कोणतेही राज्‍य जिंकता येत नाही, याची त्‍याला कल्‍पना होती. त्‍याकाळी तेथे बौद्ध लोक रहात होते. महंमद कासिमने त्‍यांना फूस लावली की, ‘तुम्‍ही बौद्ध आहात आणि राजा दाहिर हा हिंदु आहे. त्‍यामुळे त्‍यांनी कासिमला सहकार्य केले पाहिजे.’ आपल्‍यात पडलेली ही पहिली फूट होती. त्‍यानंतर बौद्ध लोकांनी त्‍याला सैनिक दिले. त्‍यामुळे राजा दाहिरचा पराभव झाला. अर्थातच त्‍यानंतर महंमद कासिमने तेथील बौद्धांचे धर्मांतर केले. अलीकडे अफगाणिस्‍तानामध्‍ये काही मूर्तींची तोडफोड करण्‍यात आली होती. त्‍यातील भगवान बुद्धाची मूर्ती ही त्‍याच बौद्ध लोकांनी बनवलेली होती.

२. हिंदु राज्‍यकर्त्‍यांमधील फुटीमुळे भारतावर सत्ता गाजवण्‍यात परकियांना यश

महंमद कासिम ३ सहस्र किलोमीटर अंतर पार करून आला होता. सिंधपासून जैसलमेर केवळ २५० किलोमीटर अंतरावर आहे; परंतु तेथील हिंदु राजा हा दाहिरच्‍या साहाय्‍याला धावून गेला नाही. तेव्‍हाही ‘आम्‍ही राजपूत आहोत’, ‘आम्‍ही सिंधी आहोत’, हा प्रांतभेद आडवा आला. जेव्‍हा जेव्‍हा आपल्‍यात फूट पडत गेली, तेव्‍हा तेव्‍हा आपण पराभूत होत गेलो. आपल्‍याला शत्रूंनी नाही, तर आपल्‍याच लोकांनी पराभूत केले.

गुरु गोविंदसिंह म्‍हणाले होते की, ‘त्‍यांचा वेगळा ‘खालसा पंथ आहे; परंतु धर्म हिंदुच आहे.’ त्‍यामुळे वेगळा शीख धर्म आला कुठून ? आपला प्रमुख उपासना पंथ हा ‘सनातन वैदिक धर्म’ आहे. सर्वप्रथम ब्रिटिशांनी सनातन वैदिक धर्माला ‘हिंदु धर्म’ म्‍हटले. त्‍यांनी शिखांना ‘तुम्‍ही हिंदु नाहीत’, असे सांगितले होते. त्‍यांनी वर्ष १८५७ च्‍या स्‍वातंत्र्ययुद्धात शिखांची दिशाभूल केली. वर्ष १८५७ मध्‍ये शिखांनी ब्रिटिशांना साथ दिली नसती, तर आपण तेव्‍हाच स्‍वतंत्र झालो असतो. ब्रिटिशांनी शिखांंना एवढे भुलवले की, ते विसरूनच गेले की, वर्ष १८४० मध्‍ये महाराजा रणजीत सिंहाचे साम्राज्‍य ब्रिटिशांनीच रद्दबातल केले होते. त्‍यानंतर केवळ १७ वर्षांतच ब्रिटीश शिखांंच्‍या पाठीशी उभे राहिले. याचे कारण ब्रिटिशांनी हिंदूंमध्‍ये फूट पाडली होती. आज ही गोष्‍ट लिंगायत समाजापर्यंत येऊन पोचली आहे.

३. स्‍वरक्षणासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्‍यक !

आज हिंदू कापले वा मारले जात आहेत. अशा वेळी आपल्‍याला एकत्र राहून संघटित राहिले पाहिजे. हिंदु म्‍हणून एकत्र राहिलो, तरच आपण सर्वजण जिवंत राहू शकतो. आज आपण ८० टक्‍के असलो, तरी जात-पात, प्रांत, भाषा यांमध्‍ये विभागले गेलो आहोत. प्रत्‍येक पंथ किंवा संप्रदाय हा २-३ टक्‍के आहे. आपण विभाजित राहिलो, तर २० टक्‍के असणारे मुसलमान आपल्‍यावर राज्‍य करतील. आपण संघटित नसण्‍यामागे आपलेच दोष आहेत. ते दूर करायचे असतील, तर वीर सावरकर यांच्‍या राजकारणाचे अनुकरण करावे लागेल.

४. म. गांधींचा खिलाफत चळवळीला पाठिंबा

वर्ष १९२३ मध्‍ये वीर सावरकर यांना ‘हिंदुत्‍व’ हा ग्रंथ लिहिण्‍याची आवश्‍यकता वाटली. त्‍यामागेही कारण आहे. वर्ष १९२१ मध्‍ये भारतात प्रथमच मुसलमानांनी एक राष्‍ट्रीय आंदोलन केले. त्‍या आंदोलनाचा भारताशी कोणताही संबंध नव्‍हता. ब्रिटीश आणि तुर्कस्‍तानची जनता यांनी तेथील राजा खलिफाला पदावरून हटवले. त्‍यानंतर केमाल पाशा हा तुर्कस्‍तानचा राष्‍ट्रपती झाला. खलिफा हा मुसलमानांतील केवळ सुन्‍नी लोकांचा धर्मगुरु आहे. त्‍याला तुर्कस्‍तानी मुसलमानांनी हटवले होते. त्‍याचा विरोध अरबस्‍तान, इराण आणि संपूर्ण पर्शिया यांपैकी कोणत्‍याही मुसलमान देशाने केला नाही. त्‍याचा विरोध भारतातील केवळ महंमद अली आणि शौकत अली या बंधूंनी केला. हे दोघेही बंधू मुस्‍लिम लिगचे नेते होते. शौकत अलीने लंडनमध्‍ये जाऊन प्रथम मागणी केली की, तुम्‍ही खिलाफतला प्रस्‍थापित करा. त्‍या वेळी म. गांधी संधीची वाटच पहात होते. त्‍यांची इच्‍छा होती की, मुसलमानांनी त्‍यांना पाठींबा द्यावा आणि त्‍यांच्‍या मागे यावेत. यानिमित्ताने त्‍यांनी संधी साधली आणि या खिलाफत आंदोलनाला पाठींबा दिला. ज्‍या आंदोलनाचा आपल्‍या देशाशी काहीच संबंध नव्‍हता.

५. खिलाफत आंदोलनाच्‍या निमित्ताने हिंदूंवर अनन्‍वित अत्‍याचार

या आंदोलनामुळे मुसलमानांमध्‍ये एक प्रेरणा जागृत केली की, ‘आम्‍ही एक वैश्‍विक राष्‍ट्र आहोत आणि खिलाफत ही वैश्‍विक संकल्‍पना आहे.’ मुसलमानांमध्‍ये राष्‍ट्रवाद नसतो. कुणी मुसलमान म्‍हणत असेल की, तो राष्‍ट्रवादी आहे, तर तो खोटे बोलत आहे. जर तो खरे बोलत असेल, तर इतर मुसलमानच त्‍याला बाहेर काढतील; कारण कुराणनुसार राष्‍ट्रवाद इस्‍लामला मान्‍य नाही. इस्‍लाम हा स्‍वतः वैश्‍विक राष्‍ट्रवाद आहे. उद्या मंगळ ग्रहावर एखादा मुसलमान निघून गेला, तर मुसलमान राष्‍ट्राची सीमा कुराणानुसार तेथपर्यंत जाईल. ‘दार उल् इस्‍लाम’वर (जेथे इस्‍लामचे शासन चालते असा प्रदेश) त्‍यांचा विश्‍वास आहे आणि ‘दार उल् इस्‍लाम’ची स्‍थापना करण्‍यासाठी साहाय्‍य करणे, हे प्रत्‍येक मुसलमानाचे धार्मिक कर्तव्‍य आहे. त्‍यासाठी खोटे बोलले, तरीही चालते. त्‍यामुळे कुणी मुसलमान म्‍हणत असेल की, तो राष्‍ट्रवादी आहे, तर तो धादांत खोटे बोलत आहे. तो जर इस्‍लामशी अप्रामाणिक असेल, तर त्‍याला मुसलमान पंथातून हाकलून देण्‍यात येईल.
आज प्रत्‍येक ठिकाणी आपल्‍याला २० टक्‍के मुसलमान संघटित असल्‍याचे दिसतात. त्‍यामुळे वीर सावरकर यांच्‍या दृष्‍टीकोनातून हिंदूंना संघटित व्‍हावे लागेल. वर्ष १९२१ मध्‍ये भारतात मुसलमानांची लोकसंख्‍या २२ टक्‍के होती. ही २२ टक्‍के लोकसंख्‍या असतांना खिलाफतचे आंदोलन झाले होते. गांधींनी त्‍यांना पाठींबा दिला होता. हे खिलाफत आंदोलन ब्रिटिशांच्‍या विरुद्ध होते; परंतु दंगली हिंदूंच्‍या विरोधात झाल्‍या.

व्‍हॉईसराय लॉर्डच्‍या पत्नीला एका महिलेने एक पत्र लिहिले होते. त्‍यात लिहिले आहे, ‘आमच्‍यावर बलात्‍कार करण्‍यात आले. आईच्‍या पोटात बाळ होते. आईचे पोट फाडून त्या बाळाला बाहेर काढले आणि त्याला रस्त्यावर फेकून देण्यात आले. तलाव आणि विहिरी यांठिकाणी जीव घेऊन पळणारे अर्धमेले लोकही होते. माझ्या नवर्‍याला ठार मारले गेले, वडिलांना जाळून टाकले आहे, तरी आपणच आमचे रक्षण करावे.’ हे पत्र वाचल्यानंतर लक्षात येईल की, वर्ष १९२१ मध्ये हिंदूंवर कसे अत्याचार झाले होते. हे सर्व अत्याचार आपण निर्ढावलेल्या मनाने पार विसरून गेलो आहोत.

६. भारत पुन्हा एकदा फाळणीच्या उंबरठ्यावर

मुसलमानांचा लढा तर ब्रिटिशांच्या विरोधात चालू होता, हत्या मात्र निरपराध हिंदूंच्या केल्या जात होत्या. ब्रिटीश असो किंवा हिंदु त्यांच्यासाठी सर्व काफिर एकसमान आहेत. वर्ष १९२१ मध्ये भारतात २२ टक्के मुसलमान होते. तेच वर्ष १९४७ मध्ये ३५ टक्के झाले. त्यानंतर त्यांनी भारताचा एक तृतीयांश भाग वेगळा तोडून नेला (तोच आजचा पाकिस्तान आहे.) त्यानंतर उर्वरित भारतामध्ये ८ टक्के मुसलमान उरले होते. ते ७५ वर्षांनी परत २२ टक्के झाले आहेत. त्यामुळे परत इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घड्याळाच्या सुईचा काटा गोल फिरून परत तेथेच आला आहे. यात भेद इतकाच आहे की, वर्ष १९२१ मध्ये त्यांचे ३-४ प्रांतांमध्ये बहुसंख्यांक होते. आज आपल्या प्रत्येक गावागावांमध्ये पसरले आहेत. आज गोव्यामध्ये एक भाग ‘मिनी पाकिस्तान’ (छोटा पाकिस्तान) झाला आहे. तो अशा ठिकाणी आहे, जेथे महामार्ग आहे, रेल्वेस्थानक आहे. तेथील विमानतळालाही त्यांनी घेरले आहे. पुढील २५ वर्षांमध्ये ते ३५ टक्के झाले, तर आपल्याला उर्वरित हिंदुस्थानही मिळणार नाही. आपल्याला केवळ स्मशानभूमी मिळेल; कारण आपल्याला पळून जाण्यासाठी कोणताही मार्ग नसणार आहे. ते आपल्याला एकही सुरक्षित ठिकाण ठेवणार नाही. आता आपण इमारतीतून बाहेर पडू शकणार नाही आणि असे खरोखर घडले आहे.

७. हिंदूंहित जोपासणार्‍याकडेच भारताची सत्ता हवी !

एखादा मुसलमान मारला जातो, तेव्हा त्याला ‘मॉब लिंचिंग’ किंवा ‘झुंडबळी’ असे म्हटले जाते. आज शेकडो हिंदू मारले जात आहेत, त्याविषयी कुणीच काही बोलत नाही. वर्ष १९४७ पर्यंत अर्धा पंजाब भारताच्या हातून निघून गेला, सिंधही निघून गेला. आजची स्थिती त्याहून भयावह आहे. अशा वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार लक्षात ठेवले पाहिजेत. अशा परिस्थितीत मी काय करू शकतो ? हाच विचार केला पाहिजे. जसा प्रत्येक मुसलमान प्रतिदिन नमाज पढत जातो, तसा तसा तो कट्टर मुसलमान बनत जातो. ज्या दिवशी मुसलमानांना आज्ञा होते, तेव्हा ते सर्वजण लढण्यासाठी येतात. आज आपल्याला लढण्यास येण्याची आवश्यकता नाही. सर्वांनी देशासाठी काही ना काही तरी करायचे आहे. ‘जो हिंदू हिताची गोष्ट करील, तोच देशावर राज्य करील’, या दृष्टीने हिंदुहिताचा विचार करणार्‍याला मत दिले पाहिजे. जसे कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आले, लगेच त्यांनी इतिहासातील पुस्तकांमधून वीर सावरकरांचे छायाचित्र हटवले. आज मुसलमान तलवार घेऊन आले. बंदुका घेऊन आले, तर आपले सैनिक आणि पोलीस त्यांच्याशी लढतील. आपल्याला केवळ चांगले शासन आणायचे आहे की, जे आमचे रक्षण करील.

– श्री. रणजित सावरकर, कार्याध्‍यक्ष, स्‍वातंत्र्यवीर सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारक, मुंबई.

देशविरोधातील मुसलमानांचे आर्थिक युद्ध !

पूर्वी मुसलमान हे गरीब होते. त्या वेळी अरबस्तानमध्ये तेल नव्हते. वर्ष १९५० मध्ये सौदी अरेबियाने प्रथम ‘नॅशनलायझेशन’ (राष्ट्रीयीकरण) कायद्याचा मसुदा आणला आणि ‘५० टक्के कराचा ५० टक्के लाभ त्या देशाच्या सरकारला देण्यात येईल’, असा कायदा केला. त्यानंतर या अरब देशांकडे पैसा येऊ लागला. हा पैसा कुठे जात आहे ? गुंतवणूक त्यांच्यासाठी ‘हराम’ आहे आणि व्याज घेणे ‘हराम’ आहे. इस्लामिक न्यायाधिशांची संकल्पना आली आणि प्रथम ‘हलाल’ (इस्लामनुसार जे वैध आहे ते) ही संकल्पना आली. मटणाचा सर्वाधिक मोठा ग्राहक हिंदू समाज आहे. कापणारे म्हणतात, ‘ते हलाल पद्धतीने पशूंना कापून त्यांचे मांस विकणार.’ त्यामुळे जवळ जवळ हिंदूंचा मोठ्या प्रमाणात पैसा त्यांच्याकडे जात आहे. ही पुष्कळ मोठी आर्थिक उलाढाल आहे आणि आर्थिक युद्धाचा तो एक भाग आहे. मटणापासून चालू झालेली हलाल समस्या ‘हलाल शेअर्स’पर्यंत (समभाग) येऊन ठेपली आहे. ‘टाटा म्युचअल फंड’च्या संकेतस्थळावर ‘हलाल इनव्हेंस्टमेंट’विषयी लिहिले आहे. भारताच्या १ सहस्र २०० आस्थापने आज मुसलमान भांडवलावर टिकून आहेत. केवळ २ किंवा ३ टक्के समभाग १ दिवसातच विक्रीला काढले, तर आस्थापन बुडू शकते. त्यामुळे हिंदूंनी ‘इस्लामशी व्यापार करणार नाही’, असा निश्चय केला पाहिजे. त्यासाठी हिंदूंनी प्रत्येक क्षेत्रात काम करणे आवश्यक आहे. हिंदु ही काही विशिष्ट उपासनापद्धत नाही, तर ते राष्ट्रीयत्व आहे. या राष्ट्रीयत्वाचे रक्षण करणे आपले काम आहे. हिंदु धर्मात निरीश्वरवाद्यांपासून सर्वजण आहेत. चार्वाकही हिंदु होता. आपली हिंदु संस्कृती आहे, तर गर्वाने म्हणा, ‘आम्ही हिंदु आहोत !’ हिंदूंचा हिंदूंशी व्यापार झाला पाहिजे.’

– श्री. रणजित सावरकर