मुंबई – ५ मे या दिवशी पहाटे ५.३० वाजता ‘होंडा सिटी’ या चारचाकीतून अतिशय निर्दयतेने दोन गायी कोंबून कसाई त्यांना कत्तलीसाठी नालासोपारा (प.) येथील वाजा मोहल्ला येथे घेऊन जात होते. त्यांच्या गाडीचा ‘अखिल भारतीय गोवंश रक्षण आणि संवर्धन परिषदे’च्या कार्यकर्त्यांनी पाठलाग केला. संतोष भुवन या परिसरातून शेवटी ‘वाझा मोहल्ला’ येथे येऊन नालासोपारा पोलीस ठाण्याला सूचित करण्यात आले. पोलिसांनी वेळेवर येत चारचाकीतील गोवंशांना सुखरूप बाहेर काढून सकवार पशू आश्रम येथे पाठवले. (प्रत्येक वेळी गोरक्षणासाठी गोरक्षकांना पोलिसांना सूचना का द्यावी लागते ? ते स्वतःहून कारवाई का करत नाहीत ? त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे का ? पोलिसांच्या अशा निष्क्रीयतेमुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि इच्छाशक्तीवर हिंदूंना संशय येतो ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|