कानपूर येथे हिंदु तरुणाने धर्मांतर करून मुसलमान मुलीशी केला विवाह !

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथे मुसलमान तरुणाने अल्‍पवयीन मुसलमान मुलीशी विवाह करण्‍यासाठी धर्मांतर केले. या संदर्भात एक व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांत प्रसारित झाला असून यात ते दोघे विवाह करत असल्‍याचे दिसत आहे. विहिंपने या घटनेची सखोल चौकशी करण्‍याची मागणी केली आहे. पोलिसांचे म्‍हणणे आहे की, ही घटना ४ मासांपूर्वीची आहे. आधी त्‍यांनी हिंदु पद्धतीनुसार विवाह केल्‍यानंतर तरुणाने धर्मांतर करून मुसलमान पद्धतीने विवाह केला.

संपादकीय भूमिका

यावरून हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्‍यकता आहे ? हेच स्‍पष्‍ट होते !