इस्लामी कट्टरतावादाकडे डोळेझाक !

लेखक सलमान रश्दी यांच्यावर इस्लामी कट्टरवाद्याने न्यूयॉर्क येथील एका कार्यक्रमात केलेले आक्रमण

भारतीय वंशाचे जगप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर इस्लामी कट्टरवाद्याने न्यूयॉर्क येथील एका कार्यक्रमात आक्रमण केले. या आक्रमणात सलमान रश्दी गंभीर घायाळ झाले असून त्यांचे यकृत आणि डोळा यांना गंभीर दुखापत झाली. रश्दी यांची ‘मिडनाईट्स चिल्ड्रेन’ ही कादंबरी जगप्रसिद्ध ठरली. जगातील १०० सर्वाेत्कृष्ट कादंबर्‍यांमध्ये तिला स्थान देण्यात आले आहे. ब्रिटनमधील ५० महान लेखकांच्या सूचीत रश्दी यांना तेरावे स्थान देण्यात आले आहे. महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून भारतामधील भाजपच्या नेत्या नूपुर शर्मा यांच्या विरोधात जागतिक पातळीवर आकांडतांडव केले जाते. हिंदूंना कट्टरपंथी ठरवण्यासाठी भारतातील तथाकथित विचारवंत आणि पुरो(अधो)गामी मंडळी यांच्यामध्ये चढाओढ लागते; परंतु सलमान रश्दी यांच्यावरील आक्रमणाविषयी ही सर्व मंडळी गप्प रहातात, तेव्हा यांच्या वैचारिक लढ्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होते.

सलमान रश्दी यांनी वर्ष १९८८ मध्ये लिहिलेल्या ‘द सॅटनिक व्हर्सेस’ या त्यांच्या पुस्तकामुळे ते वादाच्या भोवर्‍यात सापडले. यामध्ये इस्लामसह महंमद पैगंबर यांचा अवमान केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. तब्बल ३४ वर्षांनंतर कट्टरतावाद्यांनी रश्दी यांना लक्ष्य केले आहे. हिंदूंना नेहमी उपदेशाचा डोस पाजणारे जावेद अख्तर यांनीही सलमान रश्दी यांच्यावरील आक्रमणाचा तोंडदेखलेपणाने निषेध केला; परंतु इस्लामिक धर्मांधांच्या ‘सर तन से जुदा’च्या फतव्याविषयी बोलायला ना ते सिद्ध आहेत, ना भारतातील तथाकथित विचारवंत ! हिंदूंना ‘आतंकवादी’ठरवण्यासाठी स्पर्धा करणारे काँग्रेसचे नेतेही याविषयी बोलायला सिद्ध नाहीत. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा ढोल बडवणारे काँग्रेसचे नेते नरवर सिंह यांनी तत्कालीन सरकारने ‘द सॅटनिक व्हर्सेस’ या पुस्तकावर घातलेल्या बंदीचे समर्थन केले आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा वापर कसा सोयीस्करपणे केला जातो, याचे हे उदाहरण होय.

धर्मांधतेकडे दुर्लक्ष परवडणारे नाही !

भारतावर ब्रिटिशांची सत्ता असतांना होत असलेले हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी प्रयत्न करणारे स्वामी श्रद्धानंद यांची अब्दुल रशीद याने हत्या केली. याच अब्दुल रशीद याचा ‘भाई रशीद’ असा उल्लेख करून मोहनदास गांधी यांनी त्याची भलावण केली होती. मोहनदास गांधी यांनी मुसलमानांच्या धर्मांधतेकडे कायमच दुर्लक्ष केले. गांधीचा हा कित्ता काँग्रेसने चालवला. त्याचा परिणाम असा झाला की, स्वातंत्र्यानंतरही देशात अनेकदा आतंकवादी आक्रमणे झाली. ही आक्रमणे केवळ भारताचा भूखंड बळकावण्यासाठी नव्हती, तर देशाला इस्लामिक राष्ट्र करण्याचे यामागे मनसुबे आहेत. मुसलमानांच्या लांगूलचालनामुळे हे सत्य दडपण्याचे काम काँग्रेसने केले. वर्ष १९९३ मध्ये मुंबईमध्ये झालेले ११ साखळी बाँबस्फोट हे हिंदूबहुल भागातच झाले होते; परंतु तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनीही ‘हे इस्लामिक आक्रमण आहे’, हे सांगण्याचे धारिष्ट्य केले नाही. केवळ मुसलमानांच्या लांगूलचालनापोटी इस्लामी कट्टरतावादाकडे वेळोवेळी दुर्लक्ष करण्यात आले आहे. भारतातील सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्या राजकीय सोयीनुसार याकडे दुर्लक्ष केले आहे.

लांगूलचालन राष्ट्रासाठी धोक्याचे !

मुळात भारतातील मुसलमानांनी देशाप्रती निष्ठा दाखवायला हवी. पाकिस्तानकडून भारतावर आक्रमण होत असेल, तर भारतातील मुसलमानांनी देशाच्या बाजूने ठामपणे उभे रहायला हवे. मुसलमानांनी इस्लामचे पालन करण्यात हिंदूंनी कधीच विरोध केलेला नाही.

भारतीय मुसलमान देशात राहून पाकिस्तानशी निष्ठा ठेवत असल्यामुळेच येथील मुसलमानांविषयी संशय बळावत आहे. याला कारण हिंदू नसून मुसलमान ‘स्वत:ची निष्ठा भारताशी आहे’, हे ठामपणे सांगत नाहीत. भारतात होणारे बाँबस्फोट हे येथील स्थानिक मुसलमानांच्या सहकार्याने होतात. यातूनच मुसलमानांच्या भारतनिष्ठेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होते. मोहनदान गांधी असो, शरद पवार असो, काँग्रेसचे नेते असो किंवा अन्य सर्वपक्षीय राजकारणी असो, यांनी कधीही भारतातील मुसलमान दुखावले जातील; म्हणून त्यांच्यामधील भारतनिष्ठेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. भारतात जैन, पारशी, बौद्ध आदी पंथही त्यांच्या धर्मानुसार आचरण करत आहेत. मुसलमानांनीही त्यांच्या धर्मानुसार आचरण केल्यास त्यांना विरोध करण्याचे कारण नाही; परंतु मुसलमानांचा कट्टरतावाद त्यांना राष्ट्रनिष्ठेपासून तोडतो, हे खरे कळीचे सूत्र आहे. हिंदु धर्मामध्ये धार्मिक श्रद्धेसह मातृभूमीशी निष्ठा ठेवण्याचे शिक्षण दिले जाते. हिंदु धर्मात मातृभूमीला देवतेचेच स्थान आहे; परंतु इस्लाम कट्टरपंथी या भूमीला ‘दार-उल्-इस्लाम’ (जेथे इस्लामचे शासन चालते, असा प्रदेश) करण्यासाठी प्रयत्नरत आहेत, हाच कळीचा मुद्दा आहे.

सलमान रश्दी यांनी इस्लामविषयी आक्षेपार्ह लिखाण केले असेल, तर त्यावर इस्लाममधील विचारवंतांनी योग्य भूमिका मांडायला हवी होती. ‘रश्दी यांनी केलेले लिखाण कसे चुकीचे आहे’, हे त्यांनी सप्रमाण दाखवून देणे अपेक्षित होते; मात्र तसे एकाही इस्लामी विचारवंताने केलेले नाही. याउलट मागील अनेक वर्षे हिंदु धर्म, हिंदूंचे सण यांवर तथाकथित पुरो(अधो)गाम्यांकडून सातत्याने टीका होत आहे; परंतु हिंदूंनी कधीही निषेध करण्यापलीकडे काही केलेले नाही. हिंदूंनी पुरोगाम्यांच्या टीकेला धर्मशास्त्राने उत्तर दिले. त्यामुळे त्या सर्व टीकाकारांना पुरून हिंदु धर्म आजही टिकून आहे. याचे कारण मुळात हिंदु धर्मच सहिष्णु आहे; परंतु इस्लामविषयी जेव्हा प्रश्न उपस्थित होतात, तेव्हा त्यांवर टीका करणार्‍यांना ठार मारले जाते. त्या वेळी मात्र हे पुरोगामी इस्लामी कट्टरतावाद्यांपुढे वैचारिक आणि मानवतावाद यांचे ज्ञान पाजळत नाहीत, हे लक्षात घ्या !

लांगूलचालनासाठी मुसलमानांच्या राष्ट्रविरोधी कारवायांकडे दुर्लक्ष करणे देशाच्या सुरक्षेसाठी घातक !