रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

१. आश्रमात आल्यानंतर मला एका वेगळ्याच लोकात आल्यासारखे वाटले !

‘धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडून सनातनच्या आश्रमात आल्यानंतर मला एका वेगळ्याच लोकात आल्यासारखे वाटले. त्यासाठी मी या महान संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. ‘या महान आश्रमाचा उत्तरोत्तर विकास व्हावा आणि भारताची आध्यात्मिक स्तरावरील विश्वगुरूच्या रूपात पुन्हा प्रतिष्ठापना व्हावी’, अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना !’

– अधिवक्ता मदनमोहन यादव, वाराणसी, उत्तरप्रदेश. (१५.६.२०२२)

२. ‘आश्रमात राहून विदेशातील व्यक्तीसुद्धा धर्माविषयी अध्ययन करत आहेत’, हे पाहून पुष्कळ प्रभावित झालो !

‘सनातन संस्था ही हिंदूंची सर्वाेत्कृष्ट आणि एकमेव संघटना आहे. ही संस्था हिंदूंना आध्यात्मिक उन्नती आणि धर्मरक्षण यासाठी प्रेरणा देते. आश्रम पाहून मी पुष्कळ प्रभावित झालो. येथे राहून विदेशातील व्यक्तीसुद्धा धर्माविषयी अध्ययन करत आहेत.’

– श्री. योगेश अग्रवाल (संस्थापक, हिंदु धर्म सेना), जबलपूर, मध्यप्रदेश. (१६.६.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक