सातारा नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ !

सातारा, २० जुलै (वार्ता.) – अनेक मासांनंतर सातारा नगरपालिकेने अतिक्रमण काढण्याची मोहीम चालू केली आहे. त्यामुळे ‘या मोहिमेमध्ये पालिकेने सातत्य ठेवावे’, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (नागरिकांना पालिकेला असे सांगावे लागणे लज्जास्पद ! – संपादक) मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाल्याने सातत्याने वाहतूककोंडी होते. फेरीवाले आणि व्यापारी यांनी राजपथावरील पदपथावर अतिक्रमण केले आहे. याविषयी अनेक वेळा सामाजिक प्रसारमाध्यमे आणि स्थानिक वृत्तपत्रे यांतून आवाज उठवूनही पालिका प्रशासन कृती करत नव्हते.