अफझलखान कबर परिसरात कलम १४४ लागू ! – शेखर सिंह, जिल्हाधिकारी

सातारा, २० जुलै (वार्ता.) – कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून ३१ डिसेंबरपर्यंत महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड येथे असणार्‍या अफझलखानाच्या कबरीच्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणारा प्रतापगड ही सातारा जिल्ह्याची ओळख आहे. याच प्रतापगडावर स्वराज्यद्रोही अफजझखान याची कबर आहे. या कबरीच्या सभोवतालच्या ३०० मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत.