‘स्वराज्य मोहिमे’च्या अंतर्गत २४ जुलैला पन्हाळा येथे शिवप्रेमींचे आंदोलन !

कोल्हापूर, २० जुलै (वार्ता.) – सर्व गडदुर्गांचा जिर्णाेद्धार करणे, गडदुर्गांवरील इस्लामी अतिक्रमणे काढून टाकणे, गडदुर्गांवर प्लास्टिक बंदी करणे, प्रत्येक गडावर भगवा ध्वज ३६५ दिवस फडकत रहाणे, विशाळगडसारखी सूत्रे प्रामुख्याने सोडवणे,  प्रत्येक गडाचा इतिहास त्याच गडावर उपलब्ध होणे, प्रत्येक शूरवीर मावळ्याची समाधी आणि जन्मस्थळ सन्मानाने बांधणे यांसह अन्य मागण्यांसाठी ‘स्वराज्य मोहिमे’च्या अंतर्गत २४ जुलैला पन्हाळा येथे सकाळी ११ वाजता शिवप्रेमींचे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात अनेक संघटना, शिवभक्त, हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी होणार आहेत.