सनातन प्रभात > Post Type > साधना > अनुभूती > परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अन्य गुरूंप्रमाणे साधकांना स्थुलातून गुरुमंत्र न देता त्यांच्या संकल्पाने सूक्ष्मातून देणे आणि त्यातूनच साधकांची वृत्ती पालटणे अन् अनुसंधानात वाढ होणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अन्य गुरूंप्रमाणे साधकांना स्थुलातून गुरुमंत्र न देता त्यांच्या संकल्पाने सूक्ष्मातून देणे आणि त्यातूनच साधकांची वृत्ती पालटणे अन् अनुसंधानात वाढ होणे
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अन्य गुरूंप्रमाणे साधकांना स्थुलातून गुरुमंत्र दिल्याचे दिसले नाही, तरी त्यांनी तो संकल्पाने सूक्ष्मातून दिला. त्यामुळे साधकांची वृत्ती पालटली आणि त्यांच्या अनुसंधानात वाढ झाली. साधकांमध्ये स्थिरता आणि नम्रता हे गुण वाढले. निर्विचार आणि आनंदस्वरूप साधकांना हे गुरुकृपायोगात साकार झाले. गुरूंनीच हे सुचवले, त्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता !’
– आधुनिक पशूवैद्य अजय गणपतराव जोशी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ६६ वर्षे) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.६.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक