कार्ती चिदंबरम यांच्या मालमत्तेवर देशभरात ११ ठिकाणी धाडी

डावीकडे कार्ती चिदंबरम्

नवी देहली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम् यांचे पुत्र कार्ती चिदंबरम् यांनी बेहिशोबी संपत्ती बाळगल्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआयकडून) १७ मे या दिवशी सकाळी ६ वाजता त्यांच्या पंजाब, ओडिशा, महाराष्ट्र, तमिळनाडू अशा एकूण ११ ठिकाणच्या मालमत्तेवर एकाच वेळी धाडी टाकल्या. वर्ष २०१० ते २०१४ या काळात झालेल्या विदेशी व्यवहाराच्या संदर्भात कार्ती चिदंबरम् यांच्या विरोधात नवीन गुन्हा नोंदवला आहे. त्यानुसार या धाडी टाकण्यात आल्या. कार्ती चिदंबरम् यांनी चुकीच्या पद्धतीने पैसे घेऊन २५० चिनी लोकांना व्हिसा दिल्याचा आरोप आहे. हे प्रकरण पंजाबमधील एका वीज प्रकल्पाशी संबंधित आहे, ज्यामध्ये व्हिसा जारी करण्यात आला होता.