पुण्यात क्षुल्लक कारणावरून तलवारीने वार करणाऱ्या ६ धर्मांधांना १२ वर्षांनंतर १० वर्षांची सक्तमजुरी !

गुलटेकडी (जिल्हा पुणे) – येथील डायस प्लॉट वसाहतीत २१ ऑक्टोबर २०११ या दिवशी आरोपी अफझल शेख रस्त्यात थुंकला. त्या वेळी गोवर्धन खुडे आणि त्यांचा मामेभाऊ कृष्णा लोंढे यांनी त्याला ‘रस्त्यात का थुंकलास ?’ अशी विचारणा केली. या कारणावरून शेख आणि त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर शेखने त्याच्या ५ धर्मांध साथीदारांना बोलावून तलवारीने खुडे यांच्यावर वार केले, तसेच लोंढे यांना दांडके आणि गज यांनी मारहाण केली. या प्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून ६ आरोपींना अटक करण्यात आली होती. साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने ६ आरोपींना १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाने आरोपींना ९ सहस्र ३०० रुपयांचा दंड ठोठावला असून दंड न भरल्यास ६ मास अतिरिक्त शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. गोवर्धन खुडे यांनी या संदर्भात स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

संपादकीय भूमिका 

क्षुल्लक कारणावरून हत्या करण्यास धजावणाऱ्या धर्मांधांची खुनशी मानसिकता समाजाला घातक आहे. अशांवर जलदगतीने खटला चालवून त्वरित कठोर शिक्षा होणे अपेक्षित असतांना १२ वर्षांनी शिक्षा होणे हा अन्याय नव्हे का ?