साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती
‘अनेक हितचिंतक वेळोवेळी सनातनच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी धन किंवा वस्तू रूपात अर्पण देत असतात. हे अर्पण योग्य ठिकाणी पोचवणे, हे प्रत्येक साधकाचे कर्तव्य असते. एके ठिकाणी मात्र या अर्पणाचा अपव्यय झाल्याचे लक्षात आले आहे. सनातनशी अलीकडेच जोडलेल्या एका कार्यकर्त्याला एका धर्मप्रेमीने संस्थेसाठी धनरूपात अर्पण दिले होते; मात्र या कार्यकर्त्याने सदर अर्पण सनातनच्या उत्तरदायी साधकाकडे जमा न करता परस्पर स्वतःसाठी खर्च केले, तसेच धर्मप्रेमीला पावतीही दिली नाही. या कार्यकर्त्याकडे दिलेल्या अर्पणाविषयी संबंधित धर्मप्रेमीने सनातनच्या उत्तरदायी साधकाला सांगितल्यानंतर ही गंभीर घटना उघडकीस आली. यानंतर संस्थेने संबंधित कार्यकर्त्याकडून ही रक्कम वसूल केली आणि धर्मप्रेमीलाही अर्पणाची पावती दिली आहे. अशा प्रकारचा अनुभव आपल्यापैकी कोणाला आला असल्यास किंवा जर कुणी सनातन संस्थेच्या नावाने राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी मिळालेल्या धनाचा अपव्यय करून अर्पणदात्याची फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्यास संबंधितांनी त्वरित संस्थेच्या उत्तरदायी साधकांना कळवावे, ही विनंती !’
– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था. (२६.६.२०२१)