पणजी – केरळमध्ये आगमन झाल्यानंतर दोन दिवसांनी नैऋत्य मोसमी (मॉन्सून) पावसाचे ५ जून या दिवशी दुपारी गोव्यात आगमन झाले. गोव्यात प्रतिवर्षी ५ जून या दिवशीच मोसमी पावसाचे आगमन होत असते.
५ आणि ६ जून या दिवशी गोव्यात अनेक भागांत गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली.