‘परात्पर गुरु डॉक्टर, तुमची फार आठवण येते ।’ ही श्री. सुमित सागवेकर यांची कविता वाचून परात्पर गुरु डॉक्टर, सनातनचे सद्गुरु आणि संत यांच्याविषयी कृतज्ञताभाव ठेवण्याविषयी मनाची झालेली विचारप्रक्रिया !

श्री. सुमित सागवेकर

‘६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनीलिहिलेली ‘परात्पर गुरु डॉक्टर, तुमची फार आठवण येते ।’ ही कविता ९.११.२०२० या दिवशीच्या दैनिक ‘सनातनप्रभात’मध्ये प्रसिद्ध झाली. या कवितेत त्यांनी परात्पर गुरु डॉक्टर, सनातनचे सर्व सद्गुरु आणि संत, तसेच साधकयांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. ही कविता वाचून झालेली माझी विचारप्रक्रिया येथे दिली आहे.

कु. कविता निकम

१. ज्या संतांनी साधनेत पुढे जाण्यासाठी साहाय्य केले, त्यांच्याविषयी प्रत्येकाने कृतज्ञतापूर्वक लिहून ठेवावे !

​प्रत्येक साधकाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून संतांचा सहवास मिळालेला असतो. प्रत्येकाने त्याची जाणीवसतत होण्याच्या दृष्टीने ‘ज्या संतांच्या माध्यमातून देवाने आतापर्यंत आपल्याला साधनेत पुढे जाण्यासाठी साहाय्य केलेआहे’, ते लिहून ठेवायला हवे. साधकाने प्रत्येक क्षणी त्याची आठवण ठेवून अंतरात कृतज्ञताभाव जागृत करायला हवा. ‘गुरुदेव आपल्या आयुष्यात आले नसते, तर आपण आता जिथे आहोत, तिथे असतो का ?’, याचा साधकाने अंतर्मुखतेनेविचार करायला हवा.

२. साधकांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून मिळणार्‍या संतसहवासासाठी कृतज्ञ असावे !

​सगुणातील संत सहवासातील क्षणमोती आपल्याला अप्रत्यक्षपणे साधनेत साहाय्य करतात. त्यासाठीही आपणकृतज्ञ रहायला हवे. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून आपल्याला संतांचा सहवास मिळत असतो. मग ते समष्टीसाठीसद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजप असू देत किंवा व्यष्टी साधनेसाठी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेलेमार्गदर्शन असू दे. त्यामुळे ‘गुरुतत्त्व आपल्या समवेत नेहमी असते’, याची जाणीव ठेवायला साहाय्य होते.

३. साधकांविषयी कृतज्ञताभाव असावा !

​आपल्याला संतांचा सहवास अल्प लाभतो, तर साधकांचा सहवास अधिक मिळतो. देव आपल्याला साधकांच्यामाध्यमातून पुष्कळ साहाय्य करतो आणि भरभरून देत असतो. त्यासाठी साधकांचेही निरीक्षण करता यायला हवे आणित्यांच्याविषयी सतत कृतज्ञताभाव ठेवायला हवा. त्यामुळे साधकांकडून शिकता येईल, त्यांच्याविषयी प्रेमभाव वाढून मनातपूर्वग्रह असतील, तर ते न्यून होण्यास साहाय्य होईल.

४. गुरुतत्त्वाप्रती कृतज्ञताभाव

​या सर्वांची आठवण, म्हणजे त्यांच्यातील गुरुतत्त्वाची आठवण असते. ‘हेच गुरुतत्त्व आपल्याला पुढे घेऊन जाणारआहे’, याची जाणीव आपल्या मनात सतत जागृत ठेवायला हवी.  ‘गुरुदेवा, तुम्हीच माझ्याकडून असे प्रयत्न करवून घ्या’, अशी मी तुमच्या चरणी प्रार्थना करते.’

– कु. कविता शंकर निकम, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.११.२०२०) ​