मंचर (पुणे) येथील श्री. पद्माकर कडूलकर यांच्या घरी लावलेल्या हळदीच्या झाडाने त्यांना दिलेला वैशिष्ट्यपूर्ण प्रतिसाद !

प्रतिकात्मक चित्र

‘४ वर्षांपूर्वी मंचर (पुणे) येथील श्री. पद्माकर कडूलकर यांनी त्यांच्या घरी हळदीची झाडे लावली होती. काही दिवसांनंतर त्यांनी हळदीची सर्व झाडे काढली; पण एक कंद चुकून मातीत राहिला होता. त्यापासून परत झाड उगवले. त्याला कडूलकर कुटुंबीय नियमित पाणी घालायचे. सौ. कडूलकरकाकू कढीपत्ता काढण्यासाठी तेथे गेल्या, तेव्हा त्यांना हळदीच्या झाडाचे एक पान हलतांना जाणवले. ‘वारा नसतांना एकच पान कसे हलते ?’, असे वाटून काकू त्या झाडापाशी गेल्या. नंतर ‘झाडाची पाने त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद देऊ लागली’, असे जाणवले. आता अन्य पानेही बोलण्याला प्रतिसाद देतात. ती पाने अनोळखी व्यक्तीला प्रतिसाद देत नाहीत.’
– सौ. अंजली मणेरीकर, नाशिक रस्ता, पुणे. (३१.१२.२०१८)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक