‘एकदा मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करत होते. नामजप करत असतांना मला श्री दुर्गादेवीचे वाहन असलेल्या सिंहाचे रागीट डोळे आणि त्याचा उघडलेला जबडा दिसण्याऐवजी त्याचे कृतज्ञताभावात असलेले डोळे अन् त्याच्या चेहर्यावर स्मितहास्य दिसत होते. तेव्हा माझ्यात आणि सिंहामध्ये सूक्ष्मातून पुढील संभाषण झाले.

सौ. अंजली अजय जोशी : सिंहा, तू पुष्कळ कृतज्ञताभावात आहेस आणि तुझ्या चेहर्यावर स्मितहास्यही दिसत आहे. हे कसे काय ?

सिंह : माझ्याकडून श्री दुर्गामातेच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होते; कारण तिच्यामुळेच मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या या भूवैकुंठात रहायला मिळत आहे. त्यामुळे मला अंतर्यामी पुष्कळ आनंद जाणवत आहे; म्हणून तुम्हाला माझ्या चेहर्यावर स्मितहास्य दिसत आहे.
वरील संवादातून माझ्या लक्षात आले, ‘आपल्यातही सिंहासारखा कृतज्ञताभाव वाढायला हवा, तसेच ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या वैकुंठात आपल्याला रहायला आणि सेवा करायला मिळत आहे’, याबद्दल आपण सदैव आनंदात अन् कृतज्ञताभावात असायला हवे !’
– सौ. अंजली अजय जोशी (वय ६३ वर्षे), ढवळी, फोंडा, गोवा. (७.४.२०२६)
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !