
१. रविवाार सुनेची ‘सोनोग्राफी’ होणे आणि सुनेची ‘सोनोग्राफी’ झाल्यावर आधुनिक वैद्यांनी ‘लगेचच स्त्रीरोगतज्ञांना अहवाल दाखवा’, असे सांगणे
‘माझ्या सूनबाई गरोदर होत्या. तिच्या कार्यालयाला रविवारी सुटी असते. त्यामुळे ‘तिची नवव्या मासात करायची ‘सोनोग्राफी’ रविवारी करूया’, असा आम्ही विचार केला. आम्ही रविवारी सकाळीच रुग्णालयात गेलो. सुनेची ‘सोनोग्राफी’ (टीप) करणार्या आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘लगेचच स्त्रीरोगतज्ञांना अहवाल दाखवा.’’ त्यानुसार आम्ही स्त्रीरोगतज्ञांना ‘सोनोग्राफी’चा अहवाल दाखवण्यासाठी प्रसुतीगृहात गेलो. (टीप : विशिष्ट ध्वनीलहरींच्या साहाय्याने पोटातील अवयवांची चित्रे घेण्याची चाचणी)
२. रविवार असूनही बालरोगतज्ञ आणि स्त्रीरोगतज्ञ हे दोघेही प्रसुतीगृहात उपलब्ध असणे अन् त्यांनी तातडीने ‘तुमच्या सुनेचे ‘सिजेरियन’ करावे लागेल’, असे सांगणे
खरेतर स्त्रीरोगतज्ञ रविवारी प्रसुतीगृहात उपलब्ध नसतात. त्यांना रविवारी सुटी असते; मात्र त्या रविवारी तातडीचे शस्त्रकर्म (‘इमर्जन्सी ऑपरेशन’) करण्यासाठी बालरोगतज्ञ आणि स्त्रीरोगतज्ञ हे दोघेही प्रसुतीगृहात आले होते. त्या दोघांनी सुनेचे अहवाल पाहून सांगितले, ‘‘आपण यांना तात्काळ भरती करूया. यांचे ‘सिजेरियन’ (टीप) करावे लागणार आहे. बाळाच्या मेंदूला रक्तपुरवठा अल्प होत आहे.’’ सुनेचे ‘सिजेरियन’ झाल्यावर जन्माला आलेले बाळ थोडे काळे निळे पडले होते. नंतर काही वेळाने ते व्यवस्थित झाले. (टीप : जेव्हा नैसर्गिक मार्गाने (Normal Delivery) बाळाचा जन्म होणे कठीण असते, तेव्हा पोटावर आणि गर्भाशयावर शस्त्रकर्म करून बाळाला बाहेर काढले जाते.)
३. अनुभवलेली गुरुकृपा
खरेच या सर्व प्रसंगात आम्ही देवाचीच कृपा अनुभवली. आम्ही मंगळवारी सुनेची ‘सोनोग्राफी’ करण्याचे ठरवले होते; परंतु आम्ही रविवारीच सुनेची ‘सोनोग्राफी’ करण्यासाठी रुग्णालयात गेलो. स्त्रीरोगतज्ञ रविवारी सुटीवर असतात. तेही ऐन वेळी उपलब्ध झाले. या सगळ्या गोष्टींचा विचार केला, तर या गोष्टी गुरुकृपेविना शक्यच नाहीत.
४. सुनेचे शस्त्रकर्म होत असतांना ‘गुरुदेवच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) शस्त्रकर्म करत आहेत’, असे मला वाटत होते. माझा नामजप आणि प्रार्थना सतत होत होत्या. मला कुठलीच काळजी किंवा चिंता वाटत नव्हती. ‘गुरुदेव माझ्या समवेत आहेत’, असेच मला वाटत होते.’
– सौ. अंजली ज. रसाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.२.२०२६)
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !
२९.४.२०२६ या दिवसापासून साधकाला स्वतःच्या आणि सेवेच्या संदर्भात जाणवत असलेले पालट !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या दिव्य भक्तीसत्संगाच्या माध्यमातून साधक अनुभवत असलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची असीम कृपा !