अशा शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन
विविध भागांतील १३ शाळा अनधिकृत

पुणे – शहरातील विविध भागांत १३ शाळा विनाअनुमती (अनधिकृत) पद्धतीने चालवल्या जात असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाने केलेल्या पडताळणीतून समोर आले. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षी या शाळांमध्ये कुणीही प्रवेश घेऊ नये, असे आवाहन महापालिकेच्या शिक्षण विभागाने केले आहे. शाळा चालू ठेवण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता न केल्याने या शाळा अनधिकृत ठरवल्या आहेत.
शहरातील बिबवेवाडी, येरवडा, कोंढवा, हडपसर, उंड्री आणि आंबेगाव या परिसरांतील १३ शाळांचा यामध्ये समावेश आहे. या शाळांना कोणतीही अनुमती दिलेली नाही. तेव्हा तेथे प्रवेश घेऊ नये. या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास होणारी शैक्षणिक हानी टाळावी, असे शिक्षण विभागाने प्रसिद्ध केले आहे.
प्रतिवर्षी अशा शाळांच्या संख्येत भर पडत आहे. शाळा चालू करण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही अनुमती न घेता खुलेपणाने शाळा चालू केल्या जात आहेत. घराजवळ शाळा असल्याने पालकांकडून अशा शाळांमध्ये प्रवेश घेतला जातो. त्यातून मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते.
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
आरोपीवर दोषारोप निश्चित !
नाशिकमध्ये पहिल्याच पावसात खोदलेल्या रस्त्यांवर चिखल !