
पणजी, ५ मे (वार्ता.) – पेडणे येथील एका माध्यमिक विद्यालयातील विज्ञान शाखेचे शिक्षक महेश चणेकर (वय ५४ वर्षे) यांनी शिक्षक म्हणून कार्यरत असतांना अल्पवयीन विद्यार्थिनीवर ४ वर्षे सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पणजी येथील जलद गती विशेष (पोक्सो) न्यायालयाने शिक्षक महेश चणेकर यांना दोषी ठरवून त्यांना ११ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आरोपीला एकूण ८५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही रक्कम पीडितास हानीभरपाई म्हणून देण्याचा आदेश देण्यात आला आहे.
न्यायाधीश डॉ. पूजा कवळेकर यांनी हा निकाल दिला आहे. भारतीय दंड संहितेचे कलम ३७६, ५०६ (२) आणि ‘पोक्सो’ कायद्याचे कलम ४ आणि ८ अंतर्गत आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयात सुनावणीच्या वेळी आरोपी स्वत:चा बचाव करतांना म्हणाला, ‘‘१० लक्ष रुपयांची लाच देण्यास नकार दिल्यामुळे अन्वेषण अधिकार्याने मला खोट्या प्रकरणात अडकवले.’’ न्यायालयाने याविषयी योग्य पुराव्यांच्या अभावी हा बचाव फेटाळून लावला. न्यायालयाने या वेळी नमूद केले की, शिक्षकाने विद्यार्थिनीवर केलेले हे कृत्य अत्यंत घृणास्पद आहे. आरोपीने विश्वासाच्या नात्याचा गैरवापर केला आहे. अशा प्रकरणी पीडितेच्या मानसिक वेदना आणि सामाजिक दबाव लक्षात घेणे आवश्यक आहे. पीडितेकडून तक्रारीसाठी झालेला विलंब हा नैसर्गिक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
शिकवणीवर्गाच्या बहाण्याने कृत्य
१. वर्ष २०१५ मध्ये पीडिता इयत्ता १० वीत शिकत होती आणि या वेळी आरोपी शिक्षक महेश चणेकर विज्ञान विषयाचे शिक्षक होते. विज्ञान विषयाची शिकवणी देण्याच्या बहाण्याने त्यांनी पीडितेला स्वत:च्या रहात्या घरी बोलावले. पीडिता तेथे एकटी असतांना प्रारंभी तिची अश्लील छायाचित्रे काढली आणि नंतर तिच्यावर बलपूर्वक लैंगिक अत्याचार केले.
२. हा प्रकार वर्ष २०१५ ते वर्ष २०१९ या ४ वर्षांच्या कालावधीत चालू होता. पीडितेने याविषयी कुणालाही काहीही सांगितल्यास तिला विज्ञान शाखेत अनुत्तीर्ण करण्यात येणार असल्याची, तसेच तिची अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ सामाजिक माध्यमात प्रसारित करण्यात येणार असल्याची धमकी आरोपीने पीडितेला दिली. या भीतीमुळे आणि लज्जेपोटी पीडितेने दीर्घकाळ मौन बाळगले; मात्र आरोपीने पुन्हा संपर्क साधून धमकावण्यास प्रारंभ केल्यानंतर १५ जून २०२० या दिवशी पीडितेने पेडणे पोेलीस ठाण्यात याविषयी तक्रार नोंदवली होती.
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात आजीची साक्ष नोंदवली
आरोपीवर दोषारोप निश्चित !
नाशिकमध्ये पहिल्याच पावसात खोदलेल्या रस्त्यांवर चिखल !
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये अवैध मद्यविक्री करणार्यांवर २३ गुन्हे नोंद !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’