
मुंबई – पोचखानवाला रोडवरील सिंग उद्यानामध्ये पोलीस उपाधीक्षकाने २३ एप्रिल या दिवशी सायंकाळी ७ वाजता एका ९ वर्षांच्या मुलीला एकटेच खेळत असल्याचे पाहून तिच्याशी अश्लील चाळे केले. मुलीने त्याच्या तावडीतून सुटका करून पळ काढला आणि सर्व घटना आईला जाऊन सांगितली. कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात कळवताच वरळी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोचले. त्या वेळी मुलीने उपाधीक्षकांकडे बोट दाखवले. वरळी पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत घृणास्पद कृत्य करणार्या उपाधीक्षकाला अटक केली. पॉक्सो तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
पोलिसांनी उपाधीक्षकाला कह्यात घेतल्याचे पाहून त्या ठिकाणी असलेल्या एक अल्पवयीन मुलाने पोलिसांकडे येऊन त्याच्यासमवेतही उपाधीक्षकाने असेच कृत्य केल्याचे सांगितले.
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !