लोहगाव (पुणे) पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षकास लाच घेतांना अटक !

रक्षकच बनले भक्षक !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – अदखलपात्र गुन्ह्यात साहाय्य करणे, पुढील काळात गुन्ह्यासंबंधी अजून साहाय्य करण्यासाठी ८० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लोहगाव पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज बरुटे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई १ मे या दिवशी सायंकाळी ७ वाजता घडली. तक्रारदाराचा भूमी खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्याच्या विरोधात लोहगाव पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्या प्रकरणात संपूर्ण साहाय्य करण्यासाठी लाच मागितली होती.

आर्.टी.ई.तून प्रवेश देण्यासाठी ४० सहस्र रुपयांची लाच !

‘शिक्षणाचा अधिकारा’तून (आर्.टी.ई.तून) प्रवेश देण्यासाठी ४० सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खासगी व्यक्ती ज्ञानेश्वर उपाख्य माऊली गंगाराम जगताप याला अटक केली. ही कारवाई पिंपरी-चिंचवड येथील आकुर्डी येथे ‘फकीर भाई पानसरे उर्दू प्राथमिक शाळे’च्या पहिल्या मजल्यावर ३० एप्रिल या दिवशी करण्यात आली. या प्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली होती.

संपादकीय भूमिका

लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्याला कठोर शिक्षा करणे आवश्यक !