प्रकरण दाबण्यासाठी विद्यार्थिनीचा गर्भपात !
शिक्षक आणि गर्भपात करणारी महिला डॉक्टर यांच्यावर गुन्हा नोंद

चित्रदुर्ग (कर्नाटक) – जिल्ह्यातील चळ्ळकेरे येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून त्याच शाळेतील एका शिक्षकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, ज्यातून विद्यार्थिनी गर्भवती राहिली. त्यानंतर शिक्षकाने एका महिला डॉक्टरच्या साहाय्याने विद्यार्थिनीचा गर्भपात घडवून आणला. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून अन्वेषण केले जात आहे.
प्राथमिक शाळेतील गणिताचा शिक्षक एच्.ओ. राजण्णा याने शाळेच्या खोलीत विद्यार्थिनीवर सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याने ती मुलगी गर्भवती राहिली. हे समजताच प्रकरण लपवण्याचा प्रयत्न शिक्षकाने केला. आधीच ठरल्याप्रमाणे चळ्ळकेरे येथील लक्ष्मी श्रीनिवास नर्सिंग होमच्या डॉ. शंकरलक्ष्मी यांच्याशी याविषयी बोलून विद्यार्थिनीचा अवैधपणे गर्भपात करण्यात आला.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर बाल संरक्षण अधिकारी रेखा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चळ्ळकेरे तळकू पोलीस ठाण्यात ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा प्रविष्ट (दाखल) करण्यात आला.
शिक्षकच विद्यार्थ्यांचे शोषण करत असल्याने शाळेतही मुले सुरक्षित नसल्याचे समोर येत आहे. संपूर्ण जिल्ह्यातून या घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात आजीची साक्ष नोंदवली
आरोपीवर दोषारोप निश्चित !