फाटक हायस्कूलमध्ये ‘शिक्षक एक सामाजिक भान’ याविषयावरील व्याख्यान

रत्नागिरी – शिक्षकांनी समाजऋण, देवऋण आणि पितृऋणाची जाणीव ठेवावी, असे सांगितले. मूठभर काम आणि ढिगभर नाव घेण्याऐवजी निष्काम कर्म करणारे शिक्षक समाजाला घडवतात, असे वक्तव्य राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या लेखिका, निवेदिका आणि माजी मुख्याध्यापिका सौ. शोभा नाखरे यांनी केले.
फाटक हायस्कूलचे संस्थापक गुरुवर्य कै. पुरुषोत्तम वासुदेव फाटक यांच्या स्मृतिदिनानिमित्त १ एप्रिल या दिवशी सांस्कृतिक सभागृहात ‘शिक्षक एक सामाजिक भान’ या विषयावरील व्याख्यान करतांना त्या बोलत होत्या. दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या घटक संस्थांमधील सर्व शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या कार्याध्यक्ष आणि फाटकगुरुजींची नात सौ. दाक्षायणी बोपर्डीकर यांनी पुरुषोत्तम वा. फाटकगुरुजींच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाची माहिती दिली. गुरुजींच्या पश्चातही त्यांची पत्नी रुक्मिणीबाई पुरुषोत्तम फाटक यांनीही ठामपणे भूमिका घेतल्याने आज शाळा चालू आहे आणि शाळेने शतक महोत्सव साजरा केला आहे.
सौ. शोभा नाखरे म्हणाल्या,
१. शिक्षकांनी स्वतःपासूनच बदल घडवून आणावा, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम रहावे, नियमित योगाभ्यास करावा आणि झोपण्यापूर्वी प्रतिदिन पुस्तकाची किमान १० पाने वाचनाची सवय लावावी.
२. शिक्षक हे विद्यार्थ्यांचे आदर्श असतात. त्यांचा पेहराव, वर्तन, नम्रपणा आणि संस्कार यांचा विद्यार्थ्यांवर मोठा प्रभाव पडतो. शिक्षकांनी सकारात्मकता, स्वदेशीचा वापर आणि सामाजिक माध्यमांचा योग्य उपयोग करावा.
३. प्रेम दिले की, ते शतपटीने आपल्याकडे परत येते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करावे, हटके विचार ठेवावेत आणि शब्दांची कंजूषी करू नये. योग्य ठिकाणी विद्यार्थ्यांचे कौतुक करावे. स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्याने अभ्यासाला चालना मिळते आणि सृजनशीलता विकसित होते. त्यामुळे शिक्षकांनी नवीन प्रयोग करण्यास धाडस दाखवावे, तसेच इतर शिक्षकांनाही प्रोत्साहन देत सहकार्याची भावना जोपासावी.
४. सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेणे आवश्यक असून सर्व शाळांची माहिती करून घेण्यासाठी शिक्षकांनी मुलाखती घेण्याची सवय लावावी. स्थानिक वृत्तपत्रांमध्ये लेखन करणे, आकाशवाणीवर कार्यक्रम सादर करणे, यांसारख्या माध्यमांतून स्वतःचे विचार मांडावेत. विशेष आणि सामान्य अशा दोन्ही प्रकारच्या शाळांमध्ये सहभाग घेतल्याने अनुभव समृद्ध होतो. स्वतःच्या अडचणींनाही संधीमध्ये रूपांतरित करता येते, याची जाणीव करून देत समाजात व्यापक संपर्क वाढवणे आवश्यक आहे.
या वेळी दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अधिवक्ता बाबासाहेब परुळेकर, मुख्याध्यापक राजन कीर, उपाध्यक्ष सौ. सुमिता भावे, कार्याध्यक्ष सौ. दाक्षायणी बोपर्डीकर, उपकार्याध्यक्ष शेखर शेट्ये, सचिव राजीव गोगटे, सहसचिव शेखर लेले, गोपालकृष्ण नाखरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !