मुलाला अटक झाल्याचे सांगून वृद्धाकडून पैसे उकळले !

डिजिटल गुन्हेगारीचे वाढलेले पेव !

प्रतीकात्मक चित्र

मुंबई – मालाड येथील ६७ वर्षीय सुशीलकुमार कुलश्रेष्ठ यांना व्हॉट्सॲपच्या अनोळखी क्रमांकावरून स्वतःला पोलीस अधिकारी म्हणवणार्‍या व्यक्तीने त्यांच्या मुलाला गुन्ह्यात अटक केल्याचे सांगून तातडीने २ लाख रुपये देण्यास सांगितले असल्याची बतावणी केली. मुलाचा फोन जप्त केल्याचे सांगून त्याला संपर्क न करण्याविषयीही सांगितले. घाबरलेले सुशीलकुमार आणि त्यांची पत्नी यांनी अधिकोषातून पैशांची जमवाजमव करून संजयकुमार शर्मा अन् समीर मंडल यांच्या खात्यांवर पावणेदोन लाख रुपये पाठवले.

त्यानंतर सुनेला संपर्क केला, तेव्हा तिने मुलाला संपर्क केल्यावर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या संदर्भात यांनी तक्रार प्रविष्ट केली असून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पैसे पाठवलेल्या दोन्ही खात्यांचे अन्वेषण चालू आहे.

संपादकीय भूमिका 

कुणीही डिजिटल स्वरूपात पैसे पाठवायला सांगितल्यावर सर्वांनीच सतर्क रहाण्याविषयी सर्वत्र अधिक प्रबोधन व्हायला हवे !