Mumbai LoveJihad And Suicide : मुंबईत धर्मांध प्रियकराच्या छळाला कंटाळून हिंदु तरुणीने केलेल्या आत्महत्येचे प्रकरण पोलिसांकडून दाबण्याचा प्रयत्न !

‘लव्ह जिहाद’ नसल्याचे पोलिसांचे म्हणणे !

डॉ. स्तुती सोनवणे

मुंबई – येथील अँटॉप हिल परिसरातील डॉ. स्तुती सोनवणे हिने आत्महत्या केली. प्रियकर फुजैल महंमद खान (वय ३१ वर्षे) हा तिचा पुष्कळ शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून तिने गळफास घेतला. तिने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या ६ पानी चिठ्ठीत प्रियकराकडून होणार्‍या मानसिक छळाविषयी सांगितले. या प्रकरणी फुजैल महंमद खान याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी ‘या प्रकरणात ‘लव्ह जिहाद’चा समावेश दिसून येत नाही’, असे सांगितले. (असे पोलीस धर्मांधांपासून हिंदूंचे काय रक्षण करणार ? – संपादक)

१. चिठ्ठीत प्रथम तिने त्या दोघांची झालेली ओळख, मैत्री आणि प्रेम यांविषयी सांगितले.

२. त्याला दारू पिणे आणि धूम्रपान करणे आदी वाई सवयीही होत्या. तो तिला अपमानास्पद वाटेल, असे बोलत असे. टोचणारे शब्द वापरत असे.

३. त्याने तिची दुचाकी तोडण्याची धमकी दिली. ‘त्याच्या पुरुषी अहंकारामुळे तो हिंसक होऊन आपल्याला मारेल’, अशी तिला सतत भीती वाटायची. त्याच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे ‘तरुण मुली चांगल्या नसतात’, असेही तो तिला सांगत असे. त्याने तिला सांगितले होते की, तुझ्यावर केलेला सगळा खर्च आणि वेळ वाया गेला.

४. स्तुतीला त्याची भीती वाटायची. त्याच्या समवेत असतांना कधीच सुरक्षित वाटत नव्हते; पण तरीही तिने त्याच्यावर प्रेम केले.

५. फैजलने वारंवार तिला म्हणायचा, ‘तू एक दिवस शीतकपाटात सापडशील.’ (हे आहे धर्मांधांचे खरे स्वरूप ! हिंदु तरुणींनो, आपल्यावर अशी वेळ येऊ नये, यासाठी वेळीच सतर्क व्हा ! – संपादक)

६. तिने लिहिले, ‘मी त्याचा त्रास सहन केला. मी मूर्ख होते. आता तर मी आणखी मूर्ख आहे. आयुष्य पुष्कळ कठीण आहे. फैय्याज सर्वांत वाईट आहे.’ (हिंदु तरुणींनो, धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमानी झाल्यास अशी वेळ तुमच्यावर येणारच नाही ! – संपादक)

. पत्राच्या शेवटी तिने तिची आई-वडील, बहीण आणि तिचे वरिष्ठ डॉ. बंगा यांची क्षमा मागितली, तसेच ‘मी आयुष्यात यशस्वी होऊ शकले नाही आणि पुरेसे पैसे कमवू शकलो नाही’, याची खंत तिला वाटत होती. ‘मृत्यूनंतर तरी मला शांती मिळेल’, असेही तिने लिहिले.

संपादकीय भूमिका

  • एखाद्या मुसलमानाने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढणे आणि छळ करून तिची फसवणूक करणे, हा ‘लव्ह जिहाद’च आहे. पोलिसांनी कितीही नाकारले, तरी हिंदू ते सत्य जाणतात. धर्मांधांची पाठराखण करणार्‍या पोलिसांना बडतर्फच करायला हवे !
  • हिंदु तरुणींनो, अशा प्रकारच्या वाढत्या घटना पहाता मुसलमानांशी मैत्री करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा ! त्यांच्या जाळ्यात अडकून स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी वेळीच धर्मनिष्ठ व्हा !