श्रीकृष्णाच्या राजकारणाचे अनुकरण करायला हवे !

पराभव न होऊ देण्यासाठी शौर्य-धैर्य पराक्रमासह युक्तीचाही अवलंब करावा लागतो. युद्धाचा प्रसंग आल्यानंतर शत्रू कोण आहे, ? त्याचे शील-चारित्र्य कसे आहे ? हे लक्षात घेऊन वागावे लागते. सज्जन आणि दुष्ट व्यक्ती यांचे शत्रूत्व सारख्याच मापाने मोजून चालत नाही, हे सर्व शिकवणारे सोदाहरणसविवेचन पटवून देणारे भगवान श्रीकृष्णाचे दिव्य भव्य चरित्र आपण जसे लक्षात ठेवावयास पाहिजे होते, तसे ते ठेवले नाही. आपण श्रीकृष्णभक्ती केली, पण सज्जनांच्या रक्षणाकरता, दुर्जनांच्या विनाशाकरता आणि धर्माच्या संस्थापनेकरता असलेल्या श्रीकृष्णाच्या राजकारणाचे कधी अनुकरण केले नाही. (साभार : ग्रंथ ‘वाटा आपल्या हिताच्या’)