
रायपूर (छत्तीसगड) – राज्यातील सरगुजा जिल्ह्यात ‘पंडो’ या आदिवासी हिंदु समुदायाच्या भूमीवर धर्मांध मुसलमानांनी अवैधरित्या नियंत्रण मिळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार लखनपूर तालुक्यात असलेल्या मांजा ग्रामपंचायत क्षेत्रातील राजाकटेल वस्तीतील आहे. येथील पंडो समुदायाने आरोप केला की, त्यांची सुमारे ५० एकर पिढीजात भूमी कट्टरतावादी मुसलमानांनी अवैधरित्या कह्यात घेतली आहे.
A concerning report from Surguja, Chhattisgarh: 50 acres of Hindu-owned land encroached by Muslims
⚠️ 80 years ago, the country was partitioned and a separate Pakistan was created. Yet today, many “Pakistans” are emerging within India itself.
🚩 This will not stop unless Hindu… pic.twitter.com/inU7exfHYS
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 8, 2026
१. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ते अनेक पिढ्यांपासून या भूमीवर रहात आहेत; मात्र मागील काही वर्षांत मोठ्या संख्येने मुसलमान येथे येऊन स्थायिक झाले आणि हळूहळू त्यांच्या भूमीवर दावा करू लागले. काही मुसलमानांनी फसवणुकीने पंडो समाजातील लोकांकडून कागदपत्रांवर अंगठे घेऊन भूमी स्वत:च्या नावावर नोंदवून घेतल्याचा आरोप आहे.
२. हळूहळू मुसलमानांनी त्यांच्या नातेवाइकांनाही येथे बोलावून वसवण्यास चालू केले. त्यामुळे आता या ठिकाणी सुमारे ८० ते ९० मुसलमान कुटुंबे रहात आहेत. पंडो समुदायाचा आरोप आहे की, ते त्यांची भूमी परत मिळवण्याचा किंवा नियंत्रण हटवण्याचा प्रयत्न करताच त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.
३. हिंदु ग्रामस्थांनी जमील अहमद, शकील अहमद, सलीम, गुलबहार अहमद, नसीम, खुर्शीद, कबीर, असलम, महंमद जमील, बाबर आणि मोहताब यांसह अनेक जणांवर भूमी बळकावल्याचा अन् छळ केल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे अर्ज देऊन गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. (अशी मागणी भूमीचे मालक असलेल्या हिंदूंना का करावी लागते ? प्रशासन स्वत:हून अवैध व्यवहाराच्या विरोधात कारवाई का करत नाही ? – संपादक)
४. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या निर्देशानुसार उदयपूर उपविभागीय अधिकार्यांच्या न्यायालयात छत्तीसगड भूमी महसूल संहितेच्या ‘कलम १७०-बी’अंतर्गत प्रकरण नोंदवण्यात आले आहे आणि भूमीवर अवैध नियंत्रण मिळवणार्या मुसलमानांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
संपादकीय भूमिका८० वर्षांपूर्वी मुसलमानांनी भारताचे विभाजन घडवून वेगळा पाकिस्तान घेतला. हिंदु भारताच्या छातीवर घाव घातला. आज भारतातही अनेक पाकिस्ताने निर्माण झाली आहेत. हिंदु समाज जागरूक झाल्याखेरीज हे थांबणे अशक्यप्राय आहे, हे लक्षात घ्या ! |
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !