३ जणांविरुद्ध गुन्हा नोंद !

जालना – जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील माहोरा गावाजवळ २३ जानेवारीच्या रात्री १२.३० वाजता ऊस वाहतूक करून गावाकडे परतणार्या ट्रॅक्टरला अडवून चालक अजय दशरथ बोर्डे यांना बळजोरीने चारचाकीत वाहनात डांबण्यात आले. त्यानंतर ट्रॅक्टरसह चालकाचे अपहरण करण्यात आले. या प्रकरणी ट्रॅक्टरचे मालक पंढरीनाथ घोरपडे यांच्या तक्रारीवरून जालिंदर चव्हाण याच्यासह ३ अनोळखी व्यक्तींविरुद्ध जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चारचाकी वाहनातील चौघांनी तोंडाला रुमाल बांधले होते. चारचाकी ट्रॅक्टरच्या समोर लावून चालकाला ओढून नेण्यात आले. या अपहरणाचे नेमके कारण समजू शकले नाही. परिसरातील सीसीटीव्हीतील चित्रीकरणाच्या आधारे पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !