KGMU Land Jihad : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील ‘किंग जॉर्ज मेडिकल युनिर्व्हसिटी’च्या परिसरात असणारी ६ थडगी हटवण्याची नोटीस

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) : येथील ‘किंग जॉर्ज मेडिकल युनिर्व्हसिटी’च्या परिसरात असणार्‍या मुसलमानांची ६ थडगी (मजारी) हटवण्याची नोटीस ‘युनिर्व्हसिटी’च्या प्रशासनाकडून संबंधितांना देण्यात आली आहे. या नोटिसी थडग्यांच्या जवळ चिकटवण्यात आल्या आहेत. यात पुढील १५ दिवसांत स्वतःहून ती हटवण्याचा आदेश देण्यात आला आहे. जर त्या हटवण्यात आल्या नाहीत, तर प्रशासनाकडून त्या हटवण्यात येतील आणि याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, असे यात म्हटले आहे. या सर्व थडगी अनधिकृत आहेत.

थडग्यांचे संरक्षण करणार्‍यांविरोधात कठोर कारवाईची चेतावणीही प्रशासनाकडून देण्यता आली आहे. अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या नियमांचा आधार घेऊन ही कारवाई करण्यात येत आहे.

थडग्यांमुळे लव्ह जिहादला प्रोत्साहन मिळत आहे ! – भाजप

भाजपचे उत्तरप्रदेश प्रांत मंत्री आणि युवा मोर्चाचे नेते अभिजात मिश्रा यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवून ही थडगी तातडीने हटवण्याची मागणी केली होती. त्यांनी आरोप केला की, ही अवैध बांधकामे संस्थेच्या सुरक्षेला धोका निर्माण करत आहेत. आरोग्य सुविधा पुरवण्यात अडथळे निर्माण होत असून ही ठिकाणे हिंसक घटनांचे केंद्र बनली आहेत. तसेच येथून कट्टरतावाद आणि ‘लव्ह जिहाद’सारख्या कारवायांना प्रोत्साहन मिळत आहे.

काही दिवसांपूर्वीच येथे लव्ह जिहादचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर येथे या अवैध थडगी असल्याचे समोर आले.

संपादकीय भूमिका

सरकारी वैद्यकीय महाविद्यालय परिसरात इतकी थडगी उभी राहीपर्यंत प्रशासन काय करत होते ?