रज-तम प्रधान व्यक्तीस्वातंत्र्यवाले !

‘रज-तम प्रधान आणि स्वेच्छेला महत्त्व देणार्‍या व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांनी उद्या ‘भ्रष्टाचार, बलात्कार, खून इत्यादी करण्याचे स्वातंत्र्य हवे’, असे म्हटल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राजकीय पक्षांनी अंतर्मुख होण्याची आवश्यकता !

‘मंदिरे, तीर्थक्षेत्रे, कुंभपर्व इत्यादी ठिकाणी स्वखर्चाने येणार्‍या लाखो भाविकांच्या तुलनेत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभांना येण्यासाठी पैसे देऊनही किती उपस्थिती असते ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आधुनिक शिक्षण आणि ईश्‍वरी ज्ञान यांतील भेद !

‘आधुनिक शिक्षणात फारतर एका विषयात पदव्युत्तर शिक्षण घेता येते. अध्यात्मात ईश्‍वराकडून ज्ञान मिळवता यायला लागले की, सर्वच विषयांतील सर्व ज्ञान प्राप्त होऊ शकते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञान आणि अध्यात्म यांतील भेद !

‘विज्ञानाला माहिती एकत्र करून एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर शोधावे लागते. याउलट अध्यात्मात प्रगती झाल्यावर माहिती जमवावी लागत नाही, कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर तात्काळ कळते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संतांनीच भारताची किंमत राखली !

‘भारतातील स्वातंत्र्यापासूनची ७५ वर्षे भारतावर राज्य केलेल्या आतापर्यंतच्या सरकारांनी नव्हे, तर संतांनीच भारताची जगात किंमत राखली आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारतियांनो, साधनेचे महत्त्व लक्षात घ्या !

‘हल्ली पाश्‍चात्त्य देशांत बहुधा भांडायला हक्काचे कुणी असावे; म्हणून लग्न करतात ! पुढे भांडणाचा कंटाळा आला की, घटस्फोट घेतात. नंतर पुन्हा लग्न करतात आणि पुन्हा घटस्फोट घेतात. असे चक्र चालू रहाते ! आपल्याकडे ही स्थिती होऊ नये; म्हणून साधना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारताची स्थिती बिकट होण्यामागील कारण !

‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद निर्माण करणार्‍यांनी हिंदूंमध्ये दुही निर्माण केली. त्यामुळे हिंदू आणि भारत यांची स्थिती बिकट झाली आहे; म्हणून दुही करणारे राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही होत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राची आवश्यकता जाणा !

‘भ्रष्टाचार, बलात्कार, बुद्धीप्रामाण्यवाद, अनैतिकता, गुंडगिरी, देशद्रोह, धर्मद्रोह इत्यादींना आता जे उधाण आले आहे, त्याला कारणीभूत आहेत, स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची ७५ वर्षे जनतेला साधना, नैतिकता इत्यादी न शिकवणारी आतापर्यंतची सरकारे ! यातूनच हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता लक्षात येते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

. . . पण देशात किती कोटी मानव सुखाने राहू शकतील, त्यांना पुरेसे अन्न-पाणी मिळेल, याचा विचार न करणार्‍या आतापर्यंतच्या सरकारांमुळे देशाची लोकसंख्या स्वातंत्र्याच्या वेळी ३५ कोटी होती. ती आता १३५ कोटींहून अधिक झाली आहे. हे सर्व सुधारण्यासाठी आता हिंदु राष्ट्र हाच पर्याय आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पुढील पिढ्यांच्या कल्याणासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक !

‘धर्मद्रोही, पुरोगामी आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांनी उद्या ‘विवाहित स्त्रियांनी मंगळसूत्र घालू नये, कुंकू लावू नये, मंगळागौर आणि वटपौर्णिमा करू नये’ इत्यादी फतवे काढल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! याकरिता पुढील पिढ्यांच्या कल्याणासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले