परिपूर्ण हिंदु धर्म !

‘हिंदूंना संशोधन करण्याची आवश्यकता नसते; कारण सुख नाही, तर आनंदप्राप्तीसाठीचे, म्हणजेच मोक्षप्राप्तीपर्यंतचे सर्व हिंदु धर्मात सांगितलेले आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अद्वितीय हिंदु धर्म !

‘हिंदु धर्माचा जितका अभ्यास करत गेलो, तितकी भगवंताने परिपूर्ण अशा हिंदु धर्मात जन्म दिल्याबद्दल कृतज्ञता वाढत गेली.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पोलिसांना नीती आणि धर्म शिकवा !

पोलिसांना कायदे, नीती आणि धर्म शिकवा, म्हणजे ते निरपराध्यांचा छळ करण्याचे अन् खोटे अहवाल तयार करण्याचे पाप करणार नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सर्वधर्मसमभावी हिंदूंसाठी हे लज्जास्पद !

‘जात्यंधता, सर्वधर्मसमभाव आणि बुद्धीप्रामाण्यवाद यांच्या आहारी गेलेल्या हिंदूंनी स्वातंत्र्यानंतर प्रगती केली आहे, असे एकतरी क्षेत्र आहे का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानवाद्यांचे संशोधन पोरखेळासारखेच !

‘पाच ज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे ज्ञान देणारे सूक्ष्मातील काहीतरी आहे, हे ज्ञात नसल्याने विज्ञानवाद्यांचे संशोधन पोरखेळासारखे असते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवादी म्हणजे धर्मद्रोही !

धर्म बुद्धीच्या पलीकडे असल्यामुळे बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी धर्म समजून न घेता धर्मावर टीका करणे, हा धर्मद्रोहच आहे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंचा कल्पनातीत सर्वधर्मसमभाव

‘विष्णूचा अवतार असलेल्या रामाने रावणाला युद्धात मारले. त्या रावणाची ‘रावण महाराज’ या नावाची भारतात २-३ ठिकाणी मंदिरे आहेत ! म्हणूनच हिंदूंना कुणी सर्वधर्मसमभाव शिकवायला नको !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवादी खरंच ʻबुद्धीप्रामाण्यवादीʼ आहेत का ?

‘त्या त्या विषयातील तज्ञ एकमेकांशी वाद करू शकतात, उदा. आधुनिक वैद्य (डॉक्टर) आधुनिक वैद्यांशी; पण अध्यात्माचा काहीच अभ्यास नसलेले आणि साधना न केलेले बुद्धीप्रामाण्यवादी अध्यात्मातील अधिकार्‍यांशी वाद करतात. यापेक्षा मूर्खपणाचे दुसरे उदाहरण आहे का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंची स्थिती अत्यंत केविलवाणी होण्याचे कारण

हिंदूंपैकी फक्त १० टक्केच हिंदू ‘खरे हिंदू’ आहेत. बाकीचे ९० टक्के केवळ जन्महिंदू आहेत. त्यामुळे हिंदूंची स्थिती जगातच नव्हे, तर भारतातही अत्यंत केविलवाणी झाली आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पांडित्य दाखवणारे केवळ पुस्तकाप्रमाणे असणे !

‘पुस्तकात शाब्दिक ज्ञान असते, ते पुस्तकाला स्वतःला समजत नाही, तसेच पांडित्य दाखवण्यापुरते ज्यांना शाब्दिक ज्ञान असते, त्यांना त्या ज्ञानाची अनुभूती आलेली नसते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले