ऋषी-मुनींचे सर्वश्रेष्ठत्व !
‘ऋषी-मुनी सप्तलोकांचा विचार करायचे, तर विज्ञान केवळ पृथ्वीवरील मानवाचा विचार करते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘ऋषी-मुनी सप्तलोकांचा विचार करायचे, तर विज्ञान केवळ पृथ्वीवरील मानवाचा विचार करते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, हा हिंदु धर्मातील एक सिद्धांत आहे. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला तिच्या प्रकृतीनुसार साधना उपलब्ध होते आणि त्यामुळे आवश्यक ती साधना होणार्यांचे प्रमाण अन्य धर्मियांपेक्षा अधिक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘भूमीपासून थोड्याश्या अंतराळापर्यंत पोचल्याचा मोठेपणा वाटणार्या विज्ञानाला सप्तलोक आणि सप्तपाताळ यांच्यावर परिणाम करणार्या पूजा, यज्ञ यांसारख्या धार्मिक विधींच्या सूक्ष्म-शास्त्राचे १ टक्का तरी ज्ञान आहे का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘भारतीय जनता स्वार्थी आणि आत्मकेंद्रित झाल्यामुळे तिला राष्ट्र अन् धर्म यांच्याबद्दल प्रेम नाही. त्यामुळे अशा या जनतेने राष्ट्र आणि धर्म यांच्याबद्दल मनात काहीच जाणीव नसणार्या उमेदवाराला निवडून दिले, तर यात आश्चर्य ते काय !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘निवडणुकीत ईश्वर उभा राहिला, तरी बहुसंख्य हिंदू त्याला मत देणार नाहीत; कारण तो कोणतीच खोटी आश्वासने देत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘राजकारणी जनतेला ‘हे देऊ, ते देऊ’, अशी आश्वासने देऊन स्वार्थी बनवतात, तर साधक जनतेला सर्वस्वाचा त्याग करायला शिकवतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘राजकारणी समाजात स्वतःच्या लाभासाठी ‘मला मत द्या’, असे सांगतात. याउलट साधक लोकांकडे स्वतःसाठी काही मागत नाहीत, उलट ‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना करा’, असे सांगतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘विज्ञान मायेतील वस्तू कशा मिळवायच्या आणि त्यांच्यापासून तात्कालिक सुख कसे मिळवायचे ?, हे शिकवते, तर अध्यात्म सर्वस्वाचा त्याग करून चिरंतन आनंद कसा मिळवायचा ?, ते शिकवते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘इंग्रजी भाषा चांगली शिकल्याने केवळ चांगली नोकरी मिळू शकते, तर संस्कृत भाषा शिकल्यामुळे अध्यात्मातील सर्वोच्च ज्ञान आणि देवही मिळू शकतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘जगात अनेक विषयांच्या अनेक पदव्या आहेत. ‘डॉक्टरेट’ सारख्या अनेक उच्च स्तरावरच्या पदव्या आहेत; मात्र त्यांपेक्षाही सर्वश्रेष्ठ पदवी आहे, ‘खर्या गुरूंचा ‘खरा शिष्य’ !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले