स्वार्थी मनुष्य !

‘भूतलावर सर्व प्राणी दुसर्‍यांसाठी जगतात. प्राणी, वनस्पती हे इतरांना काही ना काही देत असतात. मनुष्य हा एकमेव प्राणी आहे की, जो केवळ स्वतःसाठी जगत असतो. तो निसर्ग, प्राणी आणि वनस्पती यांच्याकडून सतत घेतच असतो. मनुष्याच्या या स्वार्थामुळेच तो इतर प्राण्यांच्या तुलनेत जास्त दुःखी असतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ʻईश्वर आहेʼ याचे ज्ञान नसलेल्या विज्ञानाची मर्यादा !

‘आजकाल आपण ज्याला ‘विज्ञान’, म्हणजे ‘विशेष ज्ञान’ म्हणतो, ते ‘विगतं ज्ञानं यस्मात्।’, म्हणजेच ‘ज्यातून ज्ञान निघून गेले आहे ते, झाले आहे.’ विज्ञानाला ‘ईश्‍वर आहे. ईश्‍वर निर्गुण निराकार आहे आणि त्याची व्याप्ती अनंत कोटी ब्रह्मांडांइतकी आहेʼ, हेही ज्ञात नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अध्यात्माची परिपूर्णता आणि विज्ञानाची बाल्यावस्था !

‘अध्यात्मामध्ये अनंत-कोटी ब्रह्मांडांचे, तसेच विश्‍वाच्या उत्पत्तीपासून प्रलयापर्यंतचे ज्ञान आहे. या तुलनेत विज्ञानाला पृथ्वी काय मनुष्याच्या देहाचे कार्यही पूर्णपणे ज्ञात झालेले नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

देव करत असलेले साहाय्‍य कसे ओळखावे ?

‘एखाद्या प्रसंगात आपल्‍याकडून झालेली चूक आपल्‍या लक्षात येणे’, हे देवाचेच साहाय्‍य असते. ‘आपल्‍या मनात येणारे अयोग्‍य विचार अनिष्‍ट शक्‍तींमुळे येत आहेत’, हे आपल्‍याला कळते.

मोक्ष देण्याचे सामर्थ्य केवळ हिंदु धर्मातच आहे !

‘अनेक हिंदू ‘हिंदु धर्माने आम्हाला काय दिले ? इतर धर्म आम्हाला अनेक गोष्टी देतात !’, असे म्हणून धर्मांतर करतात. ‘केवळ हिंदु धर्मच मोक्ष देतो, इतर धर्म नाही’, हे हिंदु धर्माचे महत्त्व हिंदूंवर बिंबवणे, हाच खरा धर्मांतर रोखण्यासाठीचा खरा उपाय आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पोलीस प्रशासन हे लक्षात घेईल का ?

‘स्वतःच्या खात्यातील भ्रष्टाचार उघडकीस न आणणारे पोलीस, समाजातील भ्रष्टाचार उघडकीस आणतील का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मतदारांनो, मत देतांना याचा विचार करा !

‘मतदारांनो, तुम्ही निवडून दिलेल्या उमेदवाराने केलेल्या चुकांसाठी तुम्हीच उत्तरदायी असणार आहात. त्यामुळे त्या चुकांचे पाप तुम्हाला लागणार आहे. हे लक्षात घेऊन मतदान करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वैयक्तिक गुणांचे महत्त्व !

‘कोणत्याही क्षेत्रामध्ये एखाद्याला केवळ त्याच्या शैक्षणिक प्रमाणपत्राने नोकरी न देता त्याचे वैयक्तिक गुण पाहूनही निवड करणे आवश्यक आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

खरा ब्राह्मण !

‘ईश्वरप्राप्तीची तळमळ असणाराच खरा ब्राह्मण होय !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मानसिक नव्हे, तर केवळ शारीरिक प्रेम असणारे हल्लीचे पती-पत्नी !

‘हल्लीच्या काळातील स्त्री-पुरुषांमधील प्रेम बहुदा केवळ शारीरिक प्रेम असते . . . त्यांचे एकमेकांशी पटले नाही, तर ते मानसिक प्रेम नसल्याने जोडीदार पालटत रहातात. लग्न केलेले असल्यास अल्पावधीच घटस्फोट होऊन ते वेगळे होतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले