गुन्हेगारांसह त्यांच्या कुटुंबियांनाही शिक्षा करा !

‘मुलांवर त्यांच्या लहानपणी सात्त्विकतेचे संस्कार केले, तर पुढे मुले गुन्हेगार होण्याची शक्यता अल्प होऊ शकते. याचा विचार करून ‘वयाने लहान असलेल्या गुन्हेगाराच्या कुटुंबियांनाही योग्य ती शिक्षा करण्याचा विचार राज्यकर्त्यांनी केला पाहिजे; कारण धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे कर्मफलन्यायानुसार पालकांनाही त्याचे परिणाम भोगावे लागतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

माया समजून घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा साधना करून ईश्‍वराशी एकरूप होणे, जास्त सोपे !

‘बुद्धीने समजण्यापलीकडे असलेले ईश्‍वराचे विश्‍वाचा व्यापार चालवण्याचे नियम, म्हणजे माया समजून घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा साधना करून ईश्‍वराशी एकरूप होणे जास्त सोपे आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

संस्कृतचे अद्वितीयत्व आणि काँग्रेसचा करंटेपणा !

‘संस्कृत भाषेत भाषासौंदर्याने नटलेली आणि जीवनविषयक मार्गदर्शन करणारी सहस्रो सुभाषिते आहेत, तशी जगातील एका भाषेत तरी आहेत का ? अशा भाषेला काँग्रेस सरकारने मृतभाषा म्हणून उद्घोषित केले !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

पूर्वीचा कुटुंबाप्रमाणे एकत्र असणारा समाज आणि आताचा तुकडे तुकडे झालेला समाज !

‘पूर्वी समाजात असलेली सात्त्विकता, सामंजस्य, प्रेमभाव इत्यादी गुणांमुळे समाजव्यवस्था नीट रहावी; म्हणून काही करावे लागायचे नाही. आता समाजात ते घटक निर्माण होण्यासाठी धर्मशिक्षण दिले जात नसल्यामुळे कायद्याचे साहाय्य घेऊन समाजव्यवस्था नीट रहाण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला जातो.’

आयुष्यात प्रारंभीपासूनच साधना करण्याचे महत्त्व !

‘अनेक नवरा-बायको आयुष्यभर भांडत असतात आणि मग म्हातारपणी ‘या त्रासावर उपाययोजना, म्हणजे केवळ साधनाच आहे’, हे त्यांच्या लक्षात येते. त्या वेळी ‘आयुष्यभर साधना केली नाही’, याचा पश्‍चाताप करण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय नसतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

परीक्षेतील गुणांपेक्षा साधनेमुळे निर्माण झालेले सद्गुण महत्त्वाचे !

‘परीक्षेतील गुणांनी फक्त ती एक परीक्षा उत्तीर्ण होता येते. साधनेमुळे निर्माण झालेल्या सद्गुणांमुळे आयुष्याची परीक्षा उत्तीर्ण होता येते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

पाश्‍चात्त्य संस्कृती आणि तत्त्वज्ञान अन् हिंदु संस्कृती आणि तत्त्वज्ञान

‘पाश्‍चात्त्य संस्कृती आणि तत्त्वज्ञान फक्त भौतिक आणि सामाजिक विषयांचा अभ्यास करतात. याउलट हिंदु संस्कृती आणि तत्त्वज्ञान भौतिक अन्‌ सामाजिक विषयांबरोबर आध्यात्मिक विषयांचा अभ्यास करतात आणि ईश्‍वरप्राप्ती या ध्येयाच्या संदर्भात मार्गदर्शन करतात.’

मायेतील प्रेम करण्यातील लाभ आणि हानी

लाभ : मायेतील असले, तरी प्रेम केल्यावर दुसर्‍यावर प्रेम कसे करायचे, हे शिकायला मिळते. ज्याला हे माहीत नसते, त्याला प्रीतीच्या पातळीला जाणे अवघड जाते. तसेच त्याच्या प्रीतीत व्यापकत्व येत नाही. हानी : बहुतेक जण प्रेमात अडकत जातात, म्हणजेच मायेत गुंतत जातात. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विविध विचारसरणींच्या संदर्भात हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व !

‘पाश्‍चात्त्य, तसेच समाजवादी, साम्यवादी इत्यादी विविध राजकीय पक्ष या सर्वांचे विचार पृथ्वीवरील मानवाला सुखी करणे यासंदर्भातील त्यांच्या विचारसरणीनुसार असतात, तर हिंदु धर्मातील विचार पृथ्वीवरील आणि मृत्त्यूत्तर जीवन सुखी कसे करायचे आणि शेवटी ईश्‍वरप्राप्ती कशी करायची, यांसंदर्भात असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्मातील ‘कर्मकांड’ विज्ञानाच्या तुलनेत कितीतरी पटींनी परिपूर्ण आहे !

‘हिंदु धर्मातील ज्या कृतींना तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी ‘कर्मकांड’ म्हणून हिणवतात, त्या कृतींचा अभ्यास केल्यास त्या विज्ञानाच्या तुलनेत कितीतरी पटींनी परिपूर्ण आहेत, हे लक्षात येऊन अभ्यासक नतमस्तक होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले