विज्ञानाचा अहंकार असलेल्यांनो, अध्यात्माच्या तुलनेत विज्ञान किती थिटे आहे, हे समजून घ्या !

‘पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, गणित, इतिहास, भूगोल इत्यादी सर्व विषय केवळ त्या त्या विषयातील माहिती सांगू शकतात. याउलट अध्यात्म हा विषय जगातील सर्व विषयांची माहिती सांगू शकतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वैज्ञानिकांचे संशोधन आणि ऋषीमुनींचे ज्ञान यांतील भेद !

‘एखादा वरवरचा भौतिक शोध लावण्यासाठी शास्त्रज्ञांना वर्षानुवर्षे संशोधन करावे लागते. त्यात पुढे इतर शास्त्रज्ञ पालटही करतात. याउलट ऋषिमुनींना सूक्ष्मातून मिळणार्‍या ज्ञानामुळे संशोधन करावे न लागता क्षणात सूक्ष्मातीसूक्ष्म सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात आणि ती अंतिम सत्य असल्यामुळे कुणाला त्यांत पालट करता येत नाहीत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

जगातील सर्व भाषांमध्ये केवळ संस्कृत भाषेतील उच्चार सर्वत्र सारखे असणे

‘लिहितांना अक्षराचे रूप महत्त्वाचे असते, तसा त्याचा उच्चार करतांना तो महत्त्वाचा असतो. जगातील सर्व भाषांमध्ये केवळ संस्कृत भाषेत याला महत्त्व दिले आहे. त्यामुळे भारतात सर्वत्र वेदोच्चार सारखेच आणि परिणामकारक आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सर्व देव करतो’, याची अनुभूती !

‘सर्व देव करतो’, असे अनेक संत म्हणतात; पण सनातनचे संत ते प्रत्यक्ष अनुभवतात !

राष्ट्राच्या विकासाचे मोजमापन कसे हवे ?

‘नागरिकांच्या आध्यात्मिक उन्नतीवरून राष्ट्राच्या विकासाचे मोजमापन केले जायला हवे; कारण भौतिक विकास कितीही झाला आणि आत्मिक (किंवा नैतिक) विकास साध्य झाला नाही, तर त्या भौतिक विकासाला काय अर्थ आहे ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अहं न बाळगता हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हा !

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करतांना ‘मी करतो’, असा अहं बाळगण्याची आवश्यकता नाही; कारण कालमाहात्म्यानुसार ते कार्य होणारच आहे; पण या कार्यात जे निःस्वार्थीपणे तन-मन-धनाचा त्याग करून सहभागी होतील, त्यांची साधना होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राष्ट्र आणि धर्मप्रेम !

‘व्यक्तीगत प्रेमापेक्षा राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम करून पहा. त्यात अधिक आनंद आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारताचे अद्वितीयत्व !

‘पाश्‍चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना त्यांच्या आध्यात्मिक विचारसरणीमुळे मानसिक आणि बौद्धिक स्तरांवरील विषय मांडणे कठीण जाणे; पण त्या स्तरांवरील पुस्तके वाचल्यामुळे ते जमू लागणे

‘हिंदूंनी साधना करण्याचे सोडल्यामुळे त्यांच्यामधील सत्त्वगुण कमी झाला. त्यामुळे रज-तम अधिक असणार्‍या परकियांना हिंदूवर सहजतेने आक्रमणे करता आली.’

स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाचे महत्त्व !

ईश्‍वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यातही ते नसणे आवश्यक आहे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले