रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाच्या आसमंतात ढगांच्या रूपाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दिसलेले श्री गणेशाचे सुंदर रूप !

सनातनच्या आश्रमात ज्याप्रमाणे विविध देवतातत्त्वे आणि पंचमहाभूते यांचे विविध माध्यमांतून प्रकटीकरण होत आहे, त्याप्रमाणे आश्रमाबाहेरील वातावरणातही अशा प्रकारे सात्त्विक अनुभूती येत आहेत.

माहीम (मुंबई) येथील वाचिका श्रीमती नीता गोरे यांना दैनिक ‘सनातन प्रभात’विषयी आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव !

रात्री दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक डोक्याखाली ठेवून मी झोपायला प्रारंभ केला आणि समवेत बारीक आवाजात भ्रमणभाषवर नामजप लावू लागले. यामुळे मला पुष्कळ सकारात्मक पालट जाणवला.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भात आलेल्या अनुभूती

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पहिल्या पानावरील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार मी प्रथम वाचते. दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे घरातील वातावरणावर सकारात्मक परिणाम होतो. आध्यात्मिक उपाय होतात. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रूपाने भगवंत समवेत असल्याची जाणीव होते.

नम्र, प्रेमळ आणि सतत हसतमुख असलेल्या कल्याण, जिल्हा ठाणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अर्चना अर्गेकर (वय ६३ वर्षे) !

सौ. अर्चना अर्गेकर नेहमी हसतमुख असतात आणि नम्रतेने बोलतात. त्यांच्या तोंडवळ्यावर कधी कुठल्याही गोष्टींचा ताण जाणवत नाही. ‘सर्वकाही देवच करून घेणार आहे’, अशी त्यांची दृढ श्रद्धा असते.

संतांची आध्यात्मिक नाती !

‘संत हे पत्नी, मुले इत्यादी मायेतील नात्यांशी जोडलेले नसतात, तर ते गुरु, गुरुबंधू, शिष्य यांसारख्या आध्यात्मिक स्तरावरील नात्यांशी जोडलेले असतात.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

अमरावती येथील सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७२ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

२० मार्च २०२२ या दिवशी सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांचा साधनाप्रवास आपण पहात आहोत. २१ मार्च २०२२ या दिवशी आपण त्यांचा संस्थेशी झालेला संपर्क आणि त्यांनी केलेला साधनेला आरंभ हा भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

प्रतिकूल परिस्थितीतही श्रीकृष्णावर दृढ श्रद्धा ठेवून भक्तीमय जीवन जगणार्‍या खामगाव (जिल्हा बुलढाणा) येथील श्रीमती उषा सुधाकर मालव (वय ८१ वर्षे) !

लहानपणापासूनच कृष्णभक्ती हा उषाताईंच्या जीवनाचा एक भाग होता. उषाताई ४ वर्षांच्या असल्यापासून त्या मंदिरात जायच्या. ‘कृष्णाशी बोलणे, कृष्णाला दुःख सांगणे, फुले गोळा करून त्यांचा हार करून कृष्णाला घालणे आणि आनंदात घरी जाणे’, हा त्यांचा नित्य नेम होता.

मृत्यूतून वाचल्यावरच जीवनाचे मोल कळते !

‘आपण जिवंत असेपर्यंत आपल्याला जीवनाचे मोल कळत नाही. एखादा अपघात, मोठे आजारपण यांसारख्या घटनांमध्ये आपण मरता मरता वाचलो की, आपल्याला आपण जिवंत असल्याचे महत्त्व कळते !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

अमरावती येथील सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७२ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीया (२० मार्च २०२२) या दिवशी सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांचा साधनाप्रवास आपण पहात आहोत. १९ मार्च २०२२ या दिवशीच्या अंकात आपण त्यांचे नोकरी करत असतांनाचे जीवन आणि वैवाहिक जीवन यांविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.

परेच्छेने वागणार्‍या आणि साधनेची तीव्र तळमळ असणार्‍या ओडिशा येथील सुश्री (कु.) सुनीता छत्तर !

सुनीताताई व्यष्टी साधनेचे प्रयत्न सातत्याने आणि गांभीर्याने करतात. त्या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्नही कठोरपणे करतात. त्या नियमित सारणी लिखाण करतात. त्या व्यष्टी साधनेचा आढावा प्रामाणिकपणे आणि नियमित देतात.