|
पणजी, १ जुलै (वार्ता.) – अन्न आणि औषध प्रशासन खात्याकडून मार्च ते जून या ४ मासांत २ लाख माशांची फार्मेलिनविषयी चाचणी केली असता याचे अहवाल नकारात्मक (निगेटिव्ह) आले आहेत, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे. ते म्हणाले, ‘‘अन्न आणि औषध प्रशासनाकडून प्रयोगशाळेतही माशांची पडताळणी केली जाते. या प्रयोगशाळेत असणार्या अत्याधुनिक उपकरणांद्वारे माशांची पडताळणी केली असून एकाही नमुन्यामध्ये फॉर्मेलिन सापडलेले नाही.’’
Ensuring that every Goan consumes safe and healthy food remains our top priority.
Since 2019, the Government of Goa has partnered with QCI to conduct 24×7 fish quality checks at:
Pollem – 33,805 samples
Patradevi – 33,989 samples
Margao Wholesale Market – 1,32,717 samplesAll… pic.twitter.com/rke35r0w2w
— Vishwajit Rane (@visrane) July 1, 2025
७ वर्षांपूर्वी मासळीमध्ये फॉर्मेलिनचे अंश सापडल्याने राज्यात खळबळ उडाली होती. वर्ष २०१९ नंतर ‘क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडिया’च्या सहकार्याने पोळे आणि पत्रादेवी येथील पडताळणी नाके आणि मडगाव मासळी मार्केटमध्ये माशांची पडताळणी होत आहे. वर्ष २०१९ नंतर पोळे येथे ३३ सहस्र ८०५ नमुने, पत्रादेवी येथे ३३ सहस्र ९८९ नमुने आणि मडगाव मासळी बाजारात १ लाख ३२ सहस्र ७१७ नमुने यांची पडताळणी करण्यात आली आहे. या सर्व नमुन्यांमध्ये फॉर्मेलिनची चाचणी नकारात्मक असल्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी म्हटले आहे.
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !